विश्व भारत ऑनलाईन :
हिंद महागारातील पृष्ठभागाच्या तापमानाचा परिणाम देशाच्या हवामानावर होण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत थंडी आणि पाऊस असेल.या कालावधीत हिमालयात पाऊस आणि बर्फवृष्टी होणार आहे. देशातील बहुतांश भागात पाऊस तसेच कडाक्याची थंडी, असे वातावरण असू शकते. उत्तर भारतातून पश्चिमी चक्रवात तर दक्षिण भारतामधून कमी दाबाचे पट्टे असे वातावरण राहणार असल्याने महाराष्ट्रातही थंडी व पाऊस राहण्याची शक्यता आहे.
कमी दाबाचे पट्टे, चक्रीय स्थिती तयार होऊन देशभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीतच तीव्र थंडीची लाट येणार असल्याचा निष्कर्ष दक्षिण आशियाई हवामान तज्ज्ञांच्या परिषदेत काढण्यात आला आहे.