विश्व भारत ऑनलाईन :
मातोश्रीचा उंबरा न ओलांडता देशात एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून हलगी वाजवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी मोठ्या शिताफीने केले. कोकणातील अनेक घरे वाहून गेली, तेव्हा त्यांनी काडीची मदत केली नाही. पुरामध्ये शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले, तेंव्हा त्यांना आधार दिला नाही. आता निवांत वेळ आहे. सगळी आमदार मातोश्रीवरून निघून गेली आहेत. कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. बसायला लोक कोणीच येत नाहीत. त्यामुळे त्यांना करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात”, अशी खोचक टीका माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद जिह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावरून ढोबळे यांनी ठाकरेवर निशाणा साधला आहे.

“उद्धव ठाकरेंना घरात करमेना,जवळ बसायला लोकं नाहीत, म्हणून आठवले शेतकरी… “
Advertisements
Advertisements
Advertisements