Breaking News

शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, चर्चांना उधाण

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
राजकारणात काहीही शक्य आहे. एकमेकांचे वैरी कधी एकत्र येतील, याचा नेम नाही. पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांपैकी 22 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील प्रसिद्ध सदर ‘रोखठोक’मधून हा दावा केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाजपनं तात्पुरती व्यवस्था निर्माण केली आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकलं आहे, अशी टीका सामनाच्या रोखठोक सदरातून करण्यात आली आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील, असं म्हणत शिंदे गट आणि भाजपवर सामना रोखठोकमधून निशाणा साधला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

भेड़-बकरियां शेर से लड सकती है? CM शिंदे का उद्धव ठाकरे पर पलटवार

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई ।महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना के नेता एकनाथ …

सिवनी में ‘जंबो सीताफल’देख खुश हुए CM शिवराज सिंह चौहान

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की सिवनी। मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने आज सिवनी में ”एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *