Breaking News

हिवाळ्यात आल्याचा रस चेहऱ्यासाठी ठरेल फायद्याचा

Advertisements

सुंदर दिसण्यासाठी वाट्टेल ते उपाय केले जातात. त्वचा उजळ आणि सुंदर दिसावी यासाठी महिला वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचाही वापर करतात. बाजारात मिळणाऱ्या या प्रसाधनांमध्ये रसायनं असतात. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक महिला चेहरा आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी घरगुती उपाय करतात. हिवाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या समस्या एका पदार्थाच्या वापराने दूर होऊ शकतात. आलं अर्थात अद्रक हा पदार्थ प्रत्येक घरात वापरला जातो.

Advertisements

खाद्यपदार्थ चवदार व्हावेत, यासाठी आल्याचा वापर प्रामुख्याने होतो. थंडीच्या दिवसात आलं सेवन केलं तर सर्दी, पडसं, घशाची खवखव कमी होते. तसंच यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. एकूण आरोग्यासाठी लाभदायक असलेलं आलं त्वचेसाठीदेखील उपयुक्त ठरतं.

Advertisements

☘️आल्याचा रस चेहऱ्यावर लावल्यास मुरुम, पुरळ, सुरकुत्या आणि बारीक रेषांसारख्या अनेक समस्या दूर होतात. चेहरा उजळ, सुंदर होण्यासाठी आल्याचा वापर नेमका कसा करावा, ते सविस्तर जाणून घेऊ या.
आलं हे बहुगुणी मानलं जातं. हिवाळ्यात आल्याचं सेवन अवश्य करावं. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसंच सर्दी, खोकला, घशातली खवखव अशा समस्या दूर होतात. आलं त्वचेच्या समस्यांवरही गुणकारी मानलं जातं. चेहरा उजळ आणि सुंदर दिसावा यासाठी महिला आल्याचा वापर करू शकतात.

☘️यामुळे चेहऱ्याची त्वचा चांगली राहते. वयाची चाळिशी पार केली असेल तर आल्याच्या पावडरमध्ये मध, लिंबाचा रस मिसळून मिश्रण आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावावं. यामुळे चेहऱ्यावरच्या त्वचेचा घट्टपणा कायम राहील. हा उपाय नियमित केला तर तुमच्या चेहऱ्यात चांगला बदल दिसून येईल.

☘️चेहऱ्यावर गुलाबी चमक हवी असेल तर आल्याच्या रसात गुलाबजल आणि मध मिसळून हा फेस मास्क 20 मिनिटं चेहऱ्यावर लावावा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागेल.

पद्धतीने चेहऱ्यावर आल्याचा रस लावला तर कमी वयात चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या कमी होऊ लागतील. तसंच चेहऱ्यावरचे काळे डागदेखील निघून जातील. याशिवाय या घरगुती उपायामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते. चेहऱ्यावर आल्याचा रस लावल्यास खराब जिवाणू नष्ट होतील. जोपर्यंत चेहऱ्याला लावलेला आल्याचा रस सुकत नाही तोपर्यंत चेहऱ्यावर मसाज केल्यास निश्चित चांगला फायदा होतो.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? प्रयोग के लिए सावधानियां जरुरी

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? …

पेेट की चर्बी कम करने के लिए 6 बातों का रखें ख्याल? बढा पेट अंदर होने लगेगा!

पेेट की चर्बी कम करने के लिए 6 बातों का रखें ख्याल? बढा पेट अंदर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *