आयुर्वेदानुसार, आहारात रोज तुपाचा समावेश आरोग्यासाठी लाभकारक आहे. तुपामुळे जेवणाची चवच वाढत नाही, तर यामुळे शरीरातील पेशींना पोषणही मिळते.
स्टीडफास्ट न्युट्रिशनचे संस्थापक अमन पुरी यांच्यानुसार तूप अनेक प्रकारे हेल्दी आहे. याने हाडे मजबूत होतात. मानसिक आरोग्यासाठी हे चांगले आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते.
तूप का खायला हवे?
-सांध्यांतील ल्युब्रिकेशनसाठी
-केस गळती थांबवण्यासाठी
-दृष्टी योग्य राहण्यासाठी
-लिपिड प्रोफाईल योग्य ठेवण्यासाठी
-ट्राय ग्लिसराईड वाढण्यापासून रोखण्यासाठी
गाय की म्हशीचे?
दोन्हीही चांगले असतात. मात्र गायीचे तूप आरोग्यासाठी अधिक चांगले आहे. गायीच्या तुपात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि के, कॅल्शियम, मिनरल्स, पोटॅशियम आणि फॉस्फोरससह अँटिऑक्सिडन्टही असतात. याशिवाय गायीच्या तुपात ओमेगा 9 फॅटी अॅसिडही असते.
गायीच्या तुपाचे फायदे
-वजन कमी करण्यात मदत
-पोटातील दाह शांत होतो
-प्रतिकारशक्ती वाढते
-मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास कमी होतो
-डोळ्यांसाठी लाभकारक आहे.
म्हशीच्या तुपाचे फायदे
-वजन वाढण्यात मदत होते
-हाडे आणि स्नायू मजबूत होतात
-मानसिक आजार दूर करण्यास मदत होते
-हायपर टेन्शन कमी होते
-हे वात दोष बॅलन्स करते
विश्वभारत News Website