Breaking News

नागपूरजवळ ट्रेनच्या धडकेत बिबट्याचे दोन तुकडे

Advertisements

नागपूरजवळील खापरखेडा-कोराडी रेल्वे रुळावर रेल्वेगाडीच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने स्थानिक पोलिस आणि वनविभागाला त्याची सूचना दिली. विकास प्रकल्पांचा फटका वन्यप्राण्यांना नेहमीच बसत आला आहे. अशा प्रकल्पांच्या ठिकाणी बरेचदा वन्यप्राण्यांसाठी ‘मेटीगेशन मेजर्स’ घेतले जात नाही. ते घेतले तरी त्यात त्रुटी असतात.वन्यप्राण्यांचा यात बळी जातो. सोमवारी सकाळी घडलेली ही घटना शहराच्या जवळपास घडली. रेल्वेची धडक इतकी जबरदस्त होती की बिबट्याचे शरीर दोन भागात विभागल्यासारखे दिसून येत होते.

Advertisements

नागपूर छिंदवाडा रेल्वे लाईनवर रेल्वे लाईन ओलांडताना एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. स्थानिक पशूप्रेमी दादु गणवीर यांनी वन परिषद अधिकारी सचिन आठवले यांना प्रथम घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच खापा वनपरिक्षेत्र व सेमिनरी हिल परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याचा ताबा घेतला आहे.

Advertisements

या भागात कोराडी राखेच्या बंधारा परिसरात घनदाट झुडपी जंगल आहे. येथे अनेक वन्य जीव प्राण्यांचा वावर असतो. मागील दोन चार महिन्यांपूर्वी परिसरात बिबट्या असल्याची चर्चा होती. मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्या अनेक दिवसांपासून या परिसरात फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. …

नागपुरात आज व उद्या पावसाचा अंदाज

राज्यासह उन्ह पावसाचा खेळ सुरु आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *