Breaking News

पुणे-नागपूर बसला भीषण अपघात : 29 प्रवासी असलेली बस

Advertisements

बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खासगी बस पूलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात बसमधील 25 प्रवासी जखमी झाल्याचे समजते.यातील 4 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवर ही घटना घडली आहे. पूजा ट्रव्हल्सची ही बस होती. ही बस (एम एच 40 सी 6969) पुण्याहून नागपूरकडे जात होती. रात्री 12 वाजेच्या सुमारास संभाजीनगर ते जालना महामार्गावरील बदनापूरजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट खाली कोसळली.

Advertisements

गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात खासगी बसला हा अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गांवर काल मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ घटना

छत्रपती संभाजीनग ते जालना महामार्गावर बदनापूर येथे ही घटना घडली. या महामार्गावर मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली कोसळली.

उपचारासाठी रुग्णालयात दाखल

या अपघाताची माहिती मिळताच बदनापूर तसेच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर अपघातामीधल जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये 25 प्रवाशी जखमी झाले असून 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जानिए विपक्षी INDIA गठबंधन दलों के नेताओं में फूट की वजह : खास खबर

जानिए विपक्षी INDIA गठबंधन दलों के नेताओं में फूट की वजह : खास खबर टेकचंद्र …

BJP आम आदमी पार्टी को पूरी तरह खत्म करना चाहती है?उसकी वजह जानिए

BJP आम आदमी पार्टी को पूरी तरह खत्म करना चाहती है?उसकी वजह जानिए टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *