Breaking News

शेतीच्या कुंपणाला विद्युत तारा जोडल्यास गुन्हा दाखल

वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. होणारे नुकसान टाळण्याकरीता शेतातील वॉल कंपाऊडला जिवंत विद्युत तारा प्रवाहीत केल्यामुळे नाहक जीव गमवावा लागतो. पंधरवाड्यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात एकाच दिवशी दोघांचा विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडल्यानंतर पोलीस अलर्ट झाले आहेत. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी शेतकऱ्यांना शेतातील कंपाऊडवर जिवंत विद्युत तारा सोडू नये, असे आवाहन केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात घनदाट अरण्यात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. वन्यप्राणी शेतपिकांचे नासधूस करतात. जंगली प्राण्यांपासून शेतमालाचे संरक्षण करण्यासाठी शेत कुंपणास अवैधरित्या विद्युत तारेची जोडणी केली जाते. विद्युत प्रवाह सोडल्यामुळे अनेक शेतकरी, गुराखी आणि प्रसंगी स्वतः शेत मालकास विद्युत शॉक लागून नाहक जीव गमवावा लागला आहे.

जिल्हयात 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत वर्षभरात 13 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे कृत्य करू नये. विद्युत तारा प्रवाहीत केल्यामुळे शेतकरी, गुराखी आणि शेत मालकांचे जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुंपणाला विद्युत तारा जोडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

About विश्व भारत

Check Also

वादग्रस्त कृषिमंत्री कोकाटे यांनी दिला राजीनामा : धनंजय मुंडे नवे कृषिमंत्री, मुख्यमंत्री नाराज

सतत शेतकऱ्यांच्या विरोधात विधाने केल्याने वादग्रस्त ठरलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आता विधान परिषदेत ऑनलाइन …

नागपूर मेट्रो स्टेशनला आग : प्रवासी..!

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *