Breaking News

बिबट्याचा कुजलेला मृतदेह आढळला : शिकारीचा संशय

Advertisements

भंडारा जिल्ह्यातील तुमसरजवळील सीतासावंगी परिसरात बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अशोक मेश्राम हे आज सकाळी त्यांच्या सहकाऱ्यांसह सीतासावंगी परिसरात गस्त घालत होते. त्यांना बिबट्याचा मृतदेह दिसून आला. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली.

Advertisements

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते, टिळक त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तीव्र विजेच्या धक्क्याने बिबट्याची शिकार करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी या भागात दोन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

जानिए विपक्षी INDIA गठबंधन दलों के नेताओं में फूट की वजह : खास खबर

जानिए विपक्षी INDIA गठबंधन दलों के नेताओं में फूट की वजह : खास खबर टेकचंद्र …

BJP आम आदमी पार्टी को पूरी तरह खत्म करना चाहती है?उसकी वजह जानिए

BJP आम आदमी पार्टी को पूरी तरह खत्म करना चाहती है?उसकी वजह जानिए टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *