Breaking News

भाजप व्यापारी प्रदेशाध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांच्या पाठपुराव्याला यश: नागपुरात १४० कोटींची ‘सिंधू आर्ट गॅलरी’…काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Advertisements

जगातील सर्वात जुनी संस्कृती असलेल्या सिंधू समाजाच्या प्राचीन परंपरेची महती सर्वांपर्यत पोचविण्यासाठी नागपूर येथे लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ स्थापन करण्यात येईल. यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून १४० कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्राप्त झाला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जाहीर केले.

Advertisements

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. भाजप व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

Advertisements

अनेक शतकाची परंपरा असलेल्या व सनातन संस्कृती जीवित ठेवणाऱ्या सिंधी समाजाने कष्टाने उद्योग व्यापारात प्रगती केली.

फाळणीनंतर या समाजाला येणाऱ्या अडचणीची आपल्याला जाणीव असून त्यांना राज्यात मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री यांनी दिले. कार्यक्रमाला आमदार कुमार आईलानी, सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी, सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर,अकादमीचे सदस्य राजेश बटवानी, मंजु कुंगवानी,तुलसी सेनिया तसेच ॲड. डॉ. दयाराम लालवानी, घनश्याम कुकरेजा, विरेंद्र कुकरेजा आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी आ. कुमार आईलानी, घनश्याम कुकरेजा, महेश सुखरामानी, विरेंद्र कुकरेजा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी सिंधी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक ॲड. डॉ. दयाराम लालवानी यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर ‘वरसो न विसार’ या सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पदभरती रखडली : आचारसंहितेनंतर नियुक्ती मिळणार?

राज्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शासनाकडून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु आचारसंहितेमुळे नियुक्ती …

भ्रष्टाचार : जिल्हा परिषदेत एकाच कामाची दोन बिलं मंजूर

जिल्हा परिषदेतील आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालक्यातील काही कामांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *