Breaking News

ओबीसींचे स्वतंत्र सर्वेक्षण होणार : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ओबीसीवर अन्याय!

Advertisements

राज्य सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो का? हे तपासून घेऊ, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. विरोधी पक्षाचे नेते संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.सरकारक़डे नोंदी होत्या, मात्र प्रमाणपत्र मिळाले नाही, अशा नोंदी सापडल्या आहेत, त्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. अधिसूचना जाहीर होऊ द्या, काही आक्षेप असेल तर त्यावर सुनावणी होईल. मराठा समाजाला मागील काळात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आरक्षण मिळाले होते मात्र उद्धव ठाकरे सरकारने टिकवले नाही. तेच आरक्षण परत देण्याची भूमिका सरकारची आहे.

Advertisements

सरकारच्या निर्णयावर छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी ती दूर करण्याचा प्रयत्न करु. या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो का? हे तपासून घेऊ. यावर आक्षेप सुद्धा मागवले आहेत. त्याची सुनावणी होईल. त्यानंतर अधिसूचना मान्य होईल,असे बावनकुळे म्हणाले. जे मुळात कुणबी समाजात होते त्या लोकांनाआता लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळेल असेही बावनकुळे म्हणाले.

Advertisements

केंद्रीय मंत्री नारायण राणे काय बोलले माहित नाही. ओबीसीवर अन्याय होणार नाही. ही भूमिका सर्वच पक्षाची आहे. सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री यांनी हे मान्य केले होते. सरकारच्या निर्णयावरुन ओबीसी समाजाचा नाराज होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ओबीसीत कोणालाही वाटेअरी करून घेतले गेले नाही. पुढे काय भूमिका येईल ते बघू. आज तरी ओबीसी समाजात अन्याय झाल्याची चिंता करण्याची गरज नाही असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. सदावर्ते यांच्यासोबत भाजपचा कुठलाही संबंध नाही, असे सांगताना बावनकुळे यांनी मनसेने भाजपवर केलेल्या टीकेला उत्तर दिले.एखाद्या वेळी भूमिका विरुद्ध गेल्यावर भाजपला बदनाम करण्याचे काम काही जण करतात,असे ते म्हणाले

Advertisements

About विश्व भारत

Check Also

छिन्दवाडा मेडिकल महाविद्यालय व हॉर्टिकल्चर कॉलेज का कार्य पूरा करेंगे : संसद नकुलनाथ के उदगार

छिन्दवाडा मेडिकल महाविद्यालय व हॉर्टिकल्चर कॉलेज का कार्य पूरा करेंगे : संसद नकुलनाथ के उदगार …

वरिष्ठजनों का अनुभव और कार्यकर्ताओं का परिश्रम जीत की गारंटी है: बृजमोहन अग्रवाल के उदगार

वरिष्ठजनों का अनुभव और कार्यकर्ताओं का परिश्रम जीत की गारंटी है: बृजमोहन अग्रवाल के उदगार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *