Breaking News

भाजपला मोठा धक्का!माजी आमदार काँग्रेसमध्ये

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रंगात येण्यास सुरुवात झालेली आहे. पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसकडून 3 वेळा विधानसभा आणि 2 वेळा विधानपरिषद सदस्य राहिलेले, तसेच सध्या भाजपमध्ये असलेले गोंदियाचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर येत्या 13 सप्टेंबरला काँग्रेसमधे घरवापसी करनार असल्याची माहिती स्वत: गोपाल अग्रवाल यांनी दिली आहे. पत्रकार परिषदे घेत ही माहिती दिली.

 

गोंदिया विधानसभा येथील माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेसमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र माजी आ. गोपालदास अग्रवाल हे पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी करणार असल्याचे संकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये अस्वस्थ होते. अखेर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे

गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, आता दिल्लीवरून त्यांच्या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. गोपाल अग्रवाल हे काँग्रेसकडून 2 वेळा विधानपरिषद तर 3 वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. मात्र 2019 च्या निवडणुकी दरम्यान त्यांनी मोदी लाटेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, त्यावेळी त्यांना भाजपने उमेदवारी ही दिली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते भाजपात अस्वस्थ होते. अखेर त्यांनी आज भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती दिली आहे.

About विश्व भारत

Check Also

प्रकाश भालेराव यांची भाजपच्या ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ता सेलच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती

दिं- ४/१०/२५ शणीवार ला,* *माहाळ्गीनगर- बेसा रोड येथे दीपलक्ष्मी* *सभाग्रह येथे भारतीय जनता पक्ष जिल्हा …

ग्राम प्रधान पुत्र प्रकाश भालेराव BJP वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ संयोजक

ग्राम प्रधान पुत्र प्रकाश भालेराव BJP वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ संयोजक टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *