एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी उदय सामंत, दीपक केसरकर, संजय शिरसाट आदी नेते उपस्थित होते. या नेत्यांसह अब्दुल सत्तार, संजय राठोड, दादा भुसे, शंभूराजे देसाई आदींशीही शिंदे यांनी मंत्रिमंडळातील समावेशाबाबत भाजपसोबत चर्चा केली आहे. भाजपने आक्षेप घेतला असला तरी शिंदे हे राठोड, सत्तार, केसरकर, तानाजी सावंत यांचा समावेश करावा, यामुद्द्यावर फडणवीस यांच्याशी पुन्हा चर्चा करण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीनही पक्षांमध्ये मंत्रीपदासाठी तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे कोणाला मंत्रिमंडळात स्थान द्यायचे व कोणाला वगळायचे, असा पेच फडणवीस व शिंदे यांच्यापुढे आहे.

Oplus_131072