Breaking News

दुचाकीवर जाताना खिशातच मोबाईलचा स्फोट आणि…!

मानसिक आजारांच्या विळख्यापासून ते फ्रॉडपर्यंत मोबाइलमुळे अनेक घटना घडत आहेत. याच मोबाईलमुळे चक्क एका मुख्याध्यापकाला प्राण गमवावे लागले. ही धक्कादायक घटना साकोली तालुक्यातील सिरेगावबांध या गावात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

मुख्याध्यापकाने खिशात ठेवलेल्या मोबाईलचा भयंकर स्फोट झाला. या स्फोटात मुख्याध्यापक गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेली व्यक्ती जखमी झाली आहे. सुरेश संग्रामे असं मृत शिक्षकाचं नाव आहे तर नत्थु गायकवाड असं जखमी असलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

माहितीनुसार, सुरेश संग्रामे कुरखेडा तालुक्यातील कसारी जि.प. प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. संग्रामे आणि गायकवाड हे दोघेही एका कार्यक्रमासाठी जात असताना अचानक संग्रामे यांच्या खिशातल्या मोबाईलचा फोनचा स्फोट होऊन कपड्याला आग लागली. त्या आगीत भाजल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बाईकवर मागे बसलेले नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. मृत सुरेश भिकाजी संग्रामे हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या देसाईगंज/वडसा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसारी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आहे. नत्थु यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संग्रामे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण!

कॉमेडियन सुनील पालच्या अपहरणाची घटना ताजी असतानाच आता ‘स्त्री २’ फेम अभिनेता मुश्ताक खान याचंही …

भिलाई का ट्रांसपोर्टर महाराष्ट्र पुलिस की रडार में : देर रात छापेमारी

भिलाई का ट्रांसपोर्टर महाराष्ट्र पुलिस की रडार में, देर रात छापेमारी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *