Breaking News

डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य यांच्या 126 व्या जयंती निमित्त स्नेह संमेलन

Advertisements

डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य यांच्या 126 व्या जयंती निमित्त स्नेह संमेलन

Advertisements

 

टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट

Advertisements

 

नागपुर जिल्हातील कोराडी विधुत विज प्रकल्प विदयुत विहार वसाहतीतील श्री शिवाजी शिक्षण संस्थाअमरावती द्वारा संचालित विद्यामंदिर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय कोराडी येथे डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 126 व्या जयंती उत्सव शाळेत उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन महादुला नगरपंचायत चे नगराध्यक्ष राजेश भाऊ रंगारी यांच्या हस्ते अध्यक्ष डॉ बबनराव चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी आजीवन सभासद अशोकराव म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला शाळा निरीक्षक हेमलता चौधरी,शाळेचे मुख्याध्यापक शैलेश भस्मे मुख्य संयोजिका निशा पाटील मान्यवर उपस्थित होते.अक्षरवेल या हस्तलिखिताचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बबनराव चौधरी व उपस्थित मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास घडून यावा या दृष्टीने विविध गटानुसार क्रीडा स्पर्धा, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा पोस्टर प्रदर्शनी,विज्ञान प्रदर्शनी, सांस्कृतिक कार्यक्रम सामूहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.शालेय प्रशासनाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून स्वयंशासित विद्यालय हा उपक्रम घेण्यात आला.डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जयजयकार करीत गौरव गीत गात प्रभात फेरीचे आयोजन महादुला परिसरातून करण्यात आले. विविध स्पर्धामधून उत्कृष्ट स्पर्धेकाचे कौतुक समारोपीय कार्यक्रमात बक्षीस देऊन. करण्यात आले. या नंतर सर्व विद्यार्थ्यांना सुरुची स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.मोठ्या प्रमाणात विधार्थ्या शिक्षक व वाल्य पालकगण उपस्थित होते।

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल कॉलेज में MBBC की छात्रा की मौत से खलबली

मेडिकल कॉलेज में MBBC की छात्रा की मौत से खलबली   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

जानिए क्या वाकई सोशल मीडिया मैनेजर कमाते हैं लाखों रुपये? 

जानिए क्या वाकई सोशल मीडिया मैनेजर कमाते हैं लाखों रुपये? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *