Breaking News

नागपुरात उद्योजकांना प्रोत्साहन देणारे ग्रामायण उद्यम प्रदर्शन १६ पासून

नागपुरात उद्योजकांना प्रोत्साहन देणारे ग्रामायण उद्यम प्रदर्शन १६ पासून

नागपूर (१२ जानेवारी): देशाच्या समृद्धीत भर टाकणाऱ्या उद्योग उद्योजकांना प्रोत्साहन देणारे ६वे ग्रामायण उद्यम प्रदर्शन १६ ते २० जानेवारी दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात येत आहे. ‘नोकर नाही, मालक व्हा, आणि इतरांना नोकऱ्या द्या’ असा संदेश हे प्रदर्शन देणार आहे. सहाव्या ग्रामायण प्रदर्शनाचे उद्घाटन १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. हे प्रदर्शन अमृत भवन आंध्र असोसिएशन परिसर, उत्तर अंबाझरी मार्ग, झाशी राणी चौकाजवळ आयोजित करण्यात आले आहे आणि ते दिवसभर सुरू राहील.

 

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सीएसआर फोरमचे अध्यक्ष श्री गिरधारी मंत्री उपस्थित राहणार आहेत. ग्रामायण प्रतिष्ठान २०१२ पासून ग्रामीण भागातील विविध उपक्रम, पर्यावरणपूरक प्रकल्प आणि सामाजिक सेवेत सक्रिय आहे. या प्रदर्शनात ग्रामीण तसेच स्थानिक उत्पादने, सेंद्रिय शेतीचे उत्पाद, पारंपरिक व पर्यावरणपूरक वस्तू, बचत गटांचे उपक्रम आणि स्वनिर्मित वस्तू यांचे प्रदर्शन होणार आहे.

 

तसेच कौशल्य विकास कार्यक्रम, नाविन्यपूर्ण स्पर्धा, CSR आणि दाते यांच्यासोबत जोडणारे उपक्रम राबवले जाणार आहेत. कला दालनात बांबू आर्ट, गोंडी आर्ट, मातीचे काम, कचऱ्यातून तयार केलेल्या कलाकृती यांचे आकर्षण असेल. ई-वेस्ट कलेक्शनमध्ये जुने कपडे व साड्या गोळा करून त्यापासून पिशव्या तयार केल्या जातील. सरकारी योजनांची माहिती व सरकारी उपक्रमांविषयी जागरूकता निर्माण करणारे स्टॉल्सही उपलब्ध असतील.

 

पाच कुटुंबांचा सुवर्ण महोत्सवी सत्कार

सहाव्या ग्रामायण प्रदर्शनात सुवर्ण महोत्सवी पिढिजात परंपरागत उद्योग/व्यवसाय करणाऱ्या पाच कुटुंबांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात येणार आहे. उद्यमशीलतेला वाव देणारे, उत्पादक, उद्योजक, स्टार्टअप, शेतकरी आणि स्वयंरोजगार यांना प्रोत्साहन देणारे हे प्रदर्शन नागपूरकरांसाठी अभिमानाचा विषय आहे.

About विश्व भारत

Check Also

धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर ड्रैगन पैलेस क्षेत्र में व्यापक बंदोबस्त

धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर ड्रैगन पैलेस क्षेत्र में व्यापक बंदोबस्त टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के जन्मदिन पर सेवा पखवाड़ा आयोजित

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के जन्मदिन पर सेवा पखवाड़ा आयोजित टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नागपुर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *