Breaking News

इंटीग्रेटेड, स्क्रिनिंग आणि स्वॅब कलेक्टिंग कोविड व्हॅन नागपुरात

Advertisements

नागपूर : प्रभाताई ओझा स्मृती सेवा संस्थेने कोरोनाचे संकट ओळखून अत्याधुनिक दजार्ची इंटीग्रेटेड स्क्रिनिंग आणि सॅम्पल कलेक्टिंग कोविड व्हॅन नागपूरकरांच्या सेवेसाठी दिली आहे. पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आज व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले.
विभागीय आयुक्तकार्यालयाच्या प्रांगणात श्री.राऊत तसेच श्री.पटोले यांनी व्हॅनची फीत कापून आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. प्रभाताई ओझा स्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष रामकिशन ओझा, कोविड व्हॅनची निर्मिती करणारे डॉ. समीर अर्बट, प्रकल्प प्रमुख पंकज शहा, सचिव डॉ. मनोहर मुद्येश्वर उपस्थित होते.
ओझा ट्रस्ट नेहमी सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्यक्रम घेतात. त्याचाच एक भाग म्हणून ही अत्याधुनिक व सुसज्ज कोविड व्हॅन त्यांनी नागपूरकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. संशयित कोरोना रुग्ण शोधून त्यांची चाचणी घेण्यासाठी उपयुक्तठरणार आहे. यावेळी डॉ. राऊत यांनी श्री.ओझा यांचे सामाजिक कायार्साठी अभिनंदन केले. यासंदर्भात डॉ. अर्बट यांनी सांगितले, की इंटीग्रेटेड स्क्रिनींग आणि सॅम्पल कलेक्टिंग कोविड व्हॅनमध्ये पॉझिटिव्ह प्रेशर बॉक्स बसविण्यात आला आहे. ज्यामुळे आतील हवा बाहेर येईल; परंतु बाहेरील हवा आत येणार नाही. वातानुकूलित यंत्रणा हेपाफिल्टरसह बसविण्यात आली आहे. (यंत्रणा शस्त्रक्रियागृहात वापरण्यात येते.) शिवाय ही व्हॅन रुंदीला कमी असल्यामुळे तपासणीसाठी ने-आण करण्यासाठी सुलभ आहे. व्हॅनमध्ये दोन डॉक्टर्स पीपीई कीट परिधान करूनच स्वॅब तपासणीचे नमुने घेतील. बरेचदा नागरिक कोरोनाची लक्षणे आढळली तरी तपासणीला जाणे टाळतात. यामुळे संसर्गाचा धोका अधिक बळावतो. अशावेळी व्हॅनच्या माध्यमातून घरपोच संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने गोळा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. प्रतिबंधित क्षेत्रासाठीही अत्यंत उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

बालासोर रेल हादसे के घायलों को अस्पताल में दिए जा रहे 50 हजारः PM मीदी आज जाएंगे बालासोर

ओडिशा के बालासोर में शुक्रवार शाम को कोरोमंडल एक्सप्रेस के चार डिब्बे मालगाड़ी से टकराने …

20 साल बाद रेल का बडा हादसा : उडीसा के बालासोर में 300 से ज्यादा यात्रियों की मौत : 1000 से ज्यादा घायल !

ओडिशा के बालासोर जिले में कोरोमंडल एक्सप्रेस और मालगाड़ी आपस में टकरा गई है. जाणकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *