गोंडपिपरी(चेतन मांदाडे) :
देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे कोणतेही कार्यक्रम घेण्यास शासनाकडून परवानगी नसल्याने नवेगाव येथील कवी अमोल मेश्राम आणि राणी मेश्राम यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवशी राज्यस्तरीय ऑनलाइन काव्य स्पर्धेचे आयोजन केले.या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल ११४ कवीनी सहभाग नोंदवला.
गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील अमोल मेश्राम आणि राणी मेश्राम यांची मुलगी बुद्धम्मी हीचा पहिला वाढदिवस आठ ऑगस्ट ला होता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. त्यामुळे आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय अमोल मेश्राम व राणी मेश्राम यांनी घेतला. साहित्य क्षेत्राशी जुळुन असलेल्या मेश्राम दाम्पत्यांनी राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेचा विषय मुलीच्या नावावरून बुद्ध-मी ठेवण्यात आला.नाविन्यपूर्ण अशा या स्पर्धेला महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेचा निकाल स्वातंत्र्य दिनी जाहीर करण्यात आला. त्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध कवी. गझलकार भाविक सुखदेवे यांनी जबाबदारी सांभाळत निकाल जाहीर केला. सर्वोत्कृष्ट कवी. नाशिक चे रत्नदीप जाधव यांच्या बुद्ध-मी या कवितेस तर उत्कृष्ट कवी कोल्हापूर येथील अक्षय ईळके त्यांच्या ‘मी बुद्ध आहे‘ कवितेस मिळाला.स्पर्धेत प्रथम क्रमांक बुलढाणा येथील सचिन अवचार यांच्या ‘बुद्ध-मी‘या कवितेस प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक चंद्रपूर येथील परमानंद जेंगठे यांच्या ‘बुद्धाची शिकवण‘ तर तृतीय क्रमांक यवतमाळ येथील कवी प्रदीप बोरकुटे यांच्या ‘झालो रे बुद्ध मी‘ या कवितेस देण्यात आला.उत्तेजनार्थ कवी. डॉ. आर. बी. हुमणे, यवतमाळ, कवी. प्रा. पांडुरंग मुंजाळ, हिंगोली, कवी. एँड. उमाकांत मधुकर आदमाणे पुणे या सर्व विजेत्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व सर्व सहभागीतांना प्रमाणपत्र देण्यात आले.
तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुप्रसिद्ध गझलकार दिलीप पाटील , कवी.सूरज दहागावकर,अक्षय उराडे, हृषीकेश तांडेकर यांनी परिश्रम घेतले.सदर स्पर्धेचे आयोजक कवी. युवा वक्ते अमोल मेश्राम , कवयित्री राणी धुळे – मेश्राम यांचेकडून सर्व विजेत्यांचे व सहभागी कवीचे अभिनंदन करण्यात आले.
Check Also
नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला
राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!
‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …