वर्धा: शहरात व आजूबाजूच्या परिसरात गेल्या 3 दिवसांपासून 7 दिवसाच्या जनता कर्फ्युबाबत चर्चा सुरू आहे ,या अफवांबद्दल एसडीओ सुरेश बगळे यांनी मंगळवार दि,1 ला स्पष्टीकरण दिले की, शहरात व परिसरात बुधवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत प्रशासनाचा कुठलाही विचार नाही. बुधवार दि, 2 पासून जनता कर्फ्यु लागू होत असल्याबाबत पोष्ट केवळ सोशल मीडियावर पसरविल्या जात आहे.आणी ह्या पूर्णपणे अफवा आहे.अशी माहिती उपविभागीय अधिकारी श्री सुरेश बगळे यांनी एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे.
गेल्या आठवड्यापासून शहर आणि परिसरामध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.दरम्यान, एसडीओ सुरेश बगळे यांनी गेल्या आठवड्यात शनिवारी आणि रविवारी दोन दिवसाच्या संचार बंदीची घोषणा केली होती, त्यानंतर बुधवारपासून शहरात 7 दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार असल्याबाबतच्या चर्चेला वेग आला होता, त्यामुळे व्यापारी आणि सामान्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.या संदर्भात एसडीओ सुरेश बगळे यांच्याशी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता बगळे म्हणाले की, ही केवळ अफवा आहे, असा कोणताही विचार प्रसासनाचा नाही.परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जातील.