- खासदारांकडून यांनी मांडवा ता. जि. वर्धा सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतांची पाहणी.
- वर्धा जिल्हयातील सर्व तालुक्यातील सोयाबीन उत्पादन शेतक-यांच्या शेतात जावून कृषी विभागाने पाहणी करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा.
वर्धाःजिल्हा प्रतिनिधी:- वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर उंड अळी, खोड अळी व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शेतक-यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-यांची अडचण लक्षात घेऊन खासदार रामदास तडस यांनी आजी मोठी, पुलई, मांडवा ता. जि. वर्धा परीसरातील सोयाबीन उत्पादन शेतक-याच्या शेतात जावून प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली. यावेळी कृषी सभापती जि. प. वर्धा माधव चंदनखेडे, जि.प.सदस्या सौ. जयश्रीताई गफाट, पुलई सरपंच अमित जगताप, सुनिल गफाट, पुलईचे उपसरपंच प्रविण लोणकर, आंजीचे सरपंच जगदीश संचेरीया, भैयासाहेब देशमुख, अमोल गायकी, तालुका कृषी अधिकारी विवेकानंद चव्हान, विशाल फाळके, किशोर रुईकर, राजभाऊ ढगे, महादेव गोहो उपस्थीत होते.
आधि कोरोना व आता वर्धा जिल्हयातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अश्या दुहेरी संकटात सापडलेला आहे, वर्धा जिल्हयातील सोयाबीन पिकांवर खोड अळी व अज्ञात रोग आल्याने मोठं संकट उभं राहिलं आहे. सोयाबीनवर अज्ञात रोग आल्याने शेतक-यांच्या हातची पिकं गेली असून त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. शेतकरी संकटात असतांना कोरोनामुळे कृषी तज्ञ व अधिकारी घरीच कामे करीत आहे त्यामुळे शेतक-यांना अधिका-यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले नसल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे, वर्धा जिल्हयातील सर्व तालुक्यातील सोयाबीन उत्पादन शेतक-यांच्या शेतात जावून कृषी विभागाने पाहणी करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभ मिळण्याकरिता सर्व शेतक-यांना सहकार्य करावे असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.