Breaking News

सोप्या, सहज व साध्य होणाऱ्या शिक्षणाच्या ऑफलाइन पद्धती…!

Advertisements

कोविड-१९ च्या प्रादुर्भाव मुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला, त्यातून शाळा-शिक्षण ही सुटले नाही, वर्क फ्रॉम होम ही संकल्पना बोलायला सोपी अन गोंडस वाटते पण प्रत्यक्षात ऑनलाईन शिक्षणात याचा वापर अन परिणामकारकता संशोधनाचा भाग आहे…! ऑनलाईन शिक्षण ग्रामीण, दुर्गम, आदिवासी वाडीवस्तीवरील मुलांपर्यंत पोहचणे तसे दिव्यच, त्याला कारणे ही तशीच आहेत, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे ने (आयआयटी) नुकतेच एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले त्यात असे आढळून आले की विद्यार्थ्यांच्या वर्गाच्या तुलनेत ऑनलाईन तासात सहभाग हा 56% असमाधानकारक तर शिक्षकांचं ऑनलाईन शिकवण्याचा अनुभव हा 74% असमाधानी आलाय त्यातून काही निष्कर्ष असे की प्रशिक्षण गरज,कमी उपस्थिती, डेटा आवश्यक,प्रश्नाचे निराकरण अशक्य, गृहपाठ अपूर्ण त्यामुळे 70% विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाबद्दल असमाधानी आहेत असा हा अहवाल अधोरेखित करतोय. त्याच्या खोलात न जाता जिथं ऑनलाईन आहे तिथे शिक्षण पोहचणे सुलभ पण जिथं शक्य नाही तिथे ऑफलाइन पर्याय हाताळणे गरजेचे वाटते,फक्त ऑनलाईन शिक्षण कशाला अशी ओरड करण्यापेक्षा ऑफलाइन शिक्षण पद्धती किंवा पर्याय कोणते असतील,आपल्या मुलांना पालकांना कोणत्या पर्यायाने अभ्यासमाला पोहचवता म्हणजे आपल्या शिक्षकाला ऑनलाईन व ऑफलाइन वर्क फ्रॉम होम दोन्ही मार्गाने करणे यथोचित राहील.

Advertisements

15 जून पासून शाळा नसली तरीशैक्षणिक वर्ष सुरू झाले येत्या काही दिवसात शाळा च भरली नाही तर Zero Learning Year ची चर्चा सुरू आहेच,मग ह्या सर्व चर्चेत ऑनलाईन ला काही ऑफलाइन पर्याय पध्दती आहेत का…? तर हो, आहेतच
मग त्या कोणत्या,अन कश्या पध्दतीने कार्यन्वित करता येतील,वापरता येतील ज्यामुळे आपण शाळा बंद राहिली तर आपले शिक्षण अखंडितपणे सुरू ठेवू शकतो त्याच सोप्या व सहज शक्य होणाऱ्या ऑफलाइन पद्धतीवर केलेले भाष्य…….

Advertisements

🔸1.फोन:- फोन हे साधन आज ग्रामीण शहरी सर्व भागात पोहचलेले जीवनावश्यक साधन,शहरी भागात एका कुटुंबात चार चार मोबाइल असतात,तर ग्रामीण भागात एक तरी आहेच,आदिवासी वाडीवस्तीवरील काही कुटुंबात अजून तो ही दुरापास्त,पण आज सर्व पालकांकडे नक्कीच उपलब्ध आहे,त्याद्वारे फोनद्वारे आपण घरून सम्पर्क करून विद्यार्थ्यांना अध्यपन विषयी गप्पा करू शकतो,शिक्षण समन्वय ठेऊ शकतो,पाठयसंदर्भ देऊ शकतो…प्रथम चा मिस कॉल द्या गोष्ट ऐका हा उपक्रम त्याना सांगू शकतो,ज्या पालकांकडे फोनच नाही त्या विद्यार्थ्यांना शेजारील किंवा गावातील त्या वर्गातील पालकांर्फत आपण तो अभ्यास पोहचवू शकतो हे मात्र खरे.

🔹2.SMS:- सर्वांकडे androd फोन नाहीत ही वस्तुस्थिती पण साधा फोन असेल तर त्यावर sms आपण निश्चितच करू शकतो त्याद्वारे आपण साधे प्रश्न,शब्द,कृती,छोटा घरगुती प्रयोग,उपक्रम,प्रकल्प सोप्या भाषेत पाठवू शकतो.पालक विद्यार्थी नेटवर्क मध्ये आल्यावर तो sms पाहून ओके रिप्लाय आला तरी आपल्याला कळू शकते की हा अभ्यास विद्यार्थ्यांना पोहचला आहे म्हणून आता ह्यामध्ये उदा.नदी,गाव,मी ह्या शब्दावरून गोष्ट बनव,स्वच्छतेच्या सवयी लिहा,पथ्यपुस्तकातील हा पाठ वाचन करा,कवितेचे स्वतःची चाल लावून गायन करा,इंग्रजी शब्द लिहा असे अन रोजच्या रोज किंवा पाक्षिक यादी करून ती आपण ह्या संदेशवहन करून सोप्या पद्धतीने पाठवू शकतो.

🔸3.वर्कशीट:- हा एक अध्यापनाचा मस्त पर्याय आहे. विषयनिहाय, इयत्तनिहाय काही प्रश्न,मजकूर,चित्र,प्रयोग,कविता प्रिंट किंवा झेरॉक्स काढून त्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना कोणाही मार्फत आपण देऊ शकतो,येथे एखादी एकत्रित विषयाची पुस्तिका करून आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो किंवा ऑनलाइन असलेल्या workshit प्रिंट काढून त्या घरी अभ्यास देऊ शकतो ह्यामध्ये प्रत्येक दिवसाची workshit सुद्धा देऊ शकतो त्यात इयत्तनिहाय आवश्यक महत्वाचे विषय आपण देऊन पालकांमार्फत देता येतील,सुधागड तालुक्याने इयत्ता 2री ते 7 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गपूर्वतयारी अंतर्गत माझी सराव पुस्तिका तीन विषय अंतर्भुत करून बनवली अन ही पुस्तिका आज ग्रामीण दुर्गम भागातील मुले आवडीने सोडवत आहेत असाही पर्याय पुढील नियोजन नुसार मासिक अध्यपणास वर्गशिक्षक आमलात आणू शकतात अन ते परिणामकारक सुद्धा ठरेल

🔹4.पेनड्राइव्ह/मेमरीकार्ड:-पालकांकडे Androd फोन तसेच इंटरनेट कमतरता ही आहेच त्यामुळे त्यांना ऑनलाईन अभ्यासमाला किंवा दीक्षा मार्फत अभ्यास करता येत नाही,पण त्यासाठी आपण एक करू शकतो दीक्षा अँपवरील व्हिडिओ एकत्रित डाउनलोड करून,इतर शिक्षकांचे घटकनिहाय ऑफलाइन व्हिडीओ, ऑडीओ, गोष्टी,संवाद, इंगजी conversation इत्यादी जे आपल्या विद्यार्थी वयोगतासाठी सहाय्यभूत ठरेल ते pendrive अथवा मेमरी कार्ड मध्ये एकत्रित टाकून पालक,गावातील तरुण ह्यांची मदत घेऊन त्याच्या मोबाइल मध्ये ते मेमरी कार्ड तसेच ज्या ठिकाणी संगणक उपलब्ध आहे,किंवा ज्या तरुण मुलाकडे laptop असेल त्यात हा फोल्डर सेव्ह करता येईल,ज्या मुलांना लागेल तसा तिथून शेअर करता येईल त्याच लाभ आपल्याला प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना करून देता येईल.

🔸5.Mini School:-ही एक भन्नाट संकल्पना आहे,सध्या महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडी गावात ही संकल्पना कार्यन्वित आहे,ह्यामध्ये गावातच जवळ जवळ चे विद्यार्थी किंवा एका घरातील भावंडे एकत्रित येऊन गावातील मोठी भावंडे, तरुण जे शिक्षणमित्र असतील त्याच्या मदतीने शिकतील,हे शिक्षणमित्र शाळेतील शिक्षकांच्या मदतीने ही प्रक्रिया करतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याच नियोजन असेल,ज्यांना जो विषय आवडतो तो विषय ते मुलांना संकल्पना स्पष्ट करण्यास मदत करतील,ही सर्व मुले गावातच असल्याने ते सुरक्षित असेल ह्या ठिकाणी ह्या शिक्षणमित्राचा अवडीच्या विषयातील संकल्पना विद्यार्थ्यांना समजून देण्यास सुलभ होईल तसेच शाळेने दिलेलं नियोजन ते ह्या मिनी स्कूल मध्ये कार्यन्वित करतील,येथे जास्त गर्दी,कोविड चे नियम पाळून ही संकल्पना शाळा-ग्रामपंचायत परवानगी ने अन पालकांच्या उत्स्फूर्त सहकार्य तुन यशस्वी होईल अन अध्यपन सुरळीत सुरू राहील.

🔹6.TV:-फोन प्रमाणे TV ही सर्व ठिकाणी उपलब्ध आहे,पण जिथे चालू आहे तिथे स्थानिक पातळीवर किंवा केबल च्या माध्यमातून एखादा शैक्षणिक चॅनेल सुद्धा सुरू करून शिक्षकांचे पाठ त्याद्वारे प्रसारित करता येईल,त्याशिवाय शासनामार्फत सुरू असलेला सह्याद्री वरील गली गली सिम सिम हा कार्यक्रम आहेच,त्या बाबत विद्यार्थ्यांना पाहण्यास प्रोत्साहित करता येईल २० जुलै पासून १ ली ते ८ वी साठी सह्याद्री वाहिनीवर शैक्षणिक मालिका टिलिमिली सुरू झाली आहे,इयत्तानिहाय अर्धा तास असलेली मालिका विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणास पूरक ठरेल,कारण TV च कंटाळा मुलांना फारसा कमीच,येथे वरील प्रमाणे स्मार्ट TV असल्यास pendriev जोडून अध्ययन अध्यापणात त्याचा वापर होईल.

🔸7.रेडिओ:- पूर्वीच्या काळातील आकाशवाणी किंवा टू इन वन संच आता outdated झाले आहेत,पण FM रेडिओ हा सध्या फोन मध्ये पर्याय असतोच,पुणे मध्य पिंपरी चिंचवड हयनी एक वाहिनी शैक्षणिक मालिकेसाठी मोफतच ठेवली आहे,अश्याप्रकारे जिल्ह्यातील प्रशासन मार्फत असे शैक्षणिक मालिका प्रसारित करून देता येतील ज्या ऑनलाइन असतील अन मोफतही..त्या माध्यमातून इयत्तनिहाय कविता,परिपाठ मधील काही घटक,भाषाअभिवाचन ,इंग्रजी स्टोरीटेलिंग,विविध कथा ज्या श्रवणीय असतात त्याचा लाभ रेडिओ मार्फत विद्यार्थ्यांना घेता येईल.

🔹8.लाऊडस्पीकर:- पूर्वी सत्यनारायण असला की ऐका सत्यनारायणाची कथा हे गीत लाऊडस्पीकर वर ऐकले की समजायचे गावात पूजा आहे,आज तसे कोण लावत नाही,पण हा लाऊडस्पीकर घंटागाडी,बसस्थानक,रेल्वेस्थानक येथे सूचना देण्यासाठी असतोच,कोविड-१९ च्या जनजागृती साठी ह्याचा अचूक वापर उपयुक्त ठरला, सर्व ग्रामपंचायत मध्ये असलेला हा लाऊडस्पीकर शैक्षणिक उपयोग ठरू शकतो गुजरातमध्ये एका गावात त्याच असाच उपयोग झाला,त्यावरून सर्व विद्यार्थ्यांना ऐकू जाईल अशी रचना करून त्यावरून प्रार्थना, कविता,बडबडगीते, गोष्टीरूप,नाट्यरूपी,संवादरूपी धडे,पाठ लावून त्यातून इयत्तनिहाय अभ्यास मुलांना घरात बसून नक्कीच प्रभावी पोहचवता येईल.

🔸9.वर्तमानपत्र:- हे साधन गावात सर्वच पालकांकडे नसेल,वाडीवस्तीवरील तर नाहीच,पण हे शाळेय स्तरावर,शिक्षकांच्या घरी दैनिक असतेच तसेच रद्दीचा गठ्ठा सहज उपलब्ध होतो . ह्या वर्तमानपत्रात आठवड्यात एक दिवस मुलांसाठी पुरवणी किंवा सदर येत असते,त्यामध्ये कथा, कविता, कोडी, चित्रे, सामान्यज्ञान ह्या सर्वांची वयोगटानुसार कात्रणे कापून ती विद्यार्थ्यांना घरी दिल्यास पूरक उपक्रम,प्रकल्प होईल,मुलांना मनोरंजनात्मक अध्यपन होण्यास मदत होईल, बहुसंख्य वर्तमानपत्र मध्ये बालमित्रांसाठी विविध शैक्षणिक सदर दर आठवड्यात येत असते,हे सदर त्यातील कात्रणे कापून त्याची pdf करून फ्लिपबूक सुद्धा बनवता येईल,जिथे नेटवर्क नाही तिथे ह्याच्या झेरॉक्स करून प्रत्यक्ष मुलांना देता येईल. अश्याप्रकारे वर्तमानपत्रमधून विषनिहाय उपक्रम देता येतील. शोध चालू ठेवला तर पर्याय आपल्या घरात च असतात ते शोधणे महत्वाचे,त्यातून एखाद्या विद्यार्थ्यांच्या घरी वर्तमानपत्र असेल तर तो त्याच नाविन्यपूर्ण वापर नक्कीच करेल.

🔹10.पाठयपुस्तक:-कोविड-१९ च्या प्रादुर्भावत पण बालभारती ने सर्व पुस्तके छापून आज ग्रामीण भागातील सर्व मुलापर्यंत ती निश्चितच पोहचली पाठयपुस्तक हा सर्व मुलांचा सखा,तो हातात आल्यामुळे घरी मुले वाचन अध्यपन करणे सुलभ.ह्यासाठी scert ने शैक्षणिक दिनदर्शिका विकसित केली आहे तोच धागा पकडून आपण आठवडा किंवा महिन्याचं विषयनिहाय घटक उपघटक पाठयपुस्तक समोर ठेऊन त्यावर आधारित सोपे प्रश्न,कविता ,वाचन,कृती उपक्रम नियोजन करून विद्यार्थी मार्गदर्शनद्वारे करून घेऊ शकतो,काहीच नाही तर मुकवाचन,प्रकटवाचन,अभिवाचन ह्या गोष्टी विद्यार्थी निहाय नियोजन करून पाठयपुस्तकाच वापर घरीच कसा करावा हे सांगू शकतो,बालभारतीच आता ची सर्व पाठयपुस्तके ही विद्यार्थीकेंद्रीत,उपक्रम आधारित असून पाठाखालील स्वाध्याय हा वैविध्यपूर्ण असाच आहे त्याच सुनियोजित वापर केला तर तो ही ऑनलाइन पर्याय आहे.

ऑनलाइन शिक्षण दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असताना ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थी ह्या शिक्षणापासून वंचीत राहू नयेत,शिक्षण दरी निर्माण होऊ नये,अथवा खंड पडू नये ह्यसाठी वर्क फ्रॉम होम मध्ये ऑफलाइन पद्धती ह्या हाताळाव्या लागतील, काहीच न करण्यापेक्षा जे उपलब्ध आहे त्यातून आपण वाट काढली तर ह्या ही पेक्षा अनेक पर्याय आपल्यासमोर खुले होत जातील,वरील पद्धती ह्या निवडक आहेत,महाराष्ट्रात खुपसे शिक्षक ह्या ही पेक्षा नाविन्यपूर्ण पद्धती वापरून शिक्षणगंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवत आहेत,त्या पद्धती ही आपण आत्मसात करून फक्त ऑनलाईन शिक्षणास नावे ठेऊन त्याला पर्याय पाहून ऑनलाईन-ऑफलाइन अभ्यासच समन्वय साधण्याचा प्रयत्न केल्यास शैक्षणिक वर्ष,मुलांचे शिक्षण,मूल्यमापन ह्यावर होणा-या चर्चेला आपण थांबवून, ही प्रक्रिया अखंडपणे कशी सुरळीत राहील अन विद्यार्थी घरीच राहून शिक्षण घेतील यासाठी केलेला हा शब्दप्रपंच…..!!

✒️संकल्पना व शब्दांकन:-श्री. राजेंद्र दत्तात्रय अंबिके
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नवोपक्रमशील व प्रयोगशील शिक्षक,ता.सुधागड,जि- रायगड

▪️संकलन:-प्रा.रावसाहेब राशिनकर-९४०४३२२९३१

Advertisements

About Vishwbharat

Check Also

अधिकाऱ्यांनी केली जंगलात ६४० एकर जमीन खरेदी : जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात काय दडलंय?

सातारा जिल्ह्यातील दुर्गम कांदाटी खोऱ्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावात उच्चपदस्थ सरकारी …

छिन्दवाडा में बिजली गिरने से स्ट्रांग रूम के CCTV कैमरे बन्द! अंधेरे की आड में खेला? नकुलनाथ ने की चर्चा

छिन्दवाडा में बिजली गिरने से स्ट्रांग रूम के CCTV कैमरे बन्द! अंधेरे की आड में …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *