* खासदारांची अधिका-यासोबत देवळी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांची नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची पाहणी.
* केन्द्रीय कृषी मंत्री यांच्याकडे व लोकसभा अधिवेशन मध्ये विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांचा प्रश्न उपस्थित करणार.
वर्धाः वर्धा जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर उंड अळी, खोड अळी व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शेतक-यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-यांची अडचण लक्षात घेऊन खासदार रामदास तडस यांनी सर्व शासकीय अधिका-यासमवेत देवळी तालुकयातील पळसगाव, आगरगांव, लोणी, इंझाळा व परीसरातील सोयाबीन उत्पादन शेतक-याच्या शेतात जावून प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली. यावेळी जि.प.उपाघ्यक्ष वैशाली येरावार, प.स.सभापती कुसुम चैधरी, तहसीलदार राजेश सरोदे, जि.प.सदस्य मुकेश भिसे, जि.प.सदस्या सुनिता राऊत, प.स.उपसभापती युवराज खडतकर, तालुका कृषी अधिकारी अश्विनी कुमार, गटविकास अधिकारी अनिल आदेपाळ व प्रशांत भोयर, जयंत येरावार, दशरथ भुजाडे, गजानन राऊत, प्रभाकर चैधरी,पळसगांवचे सरपंच रितेश कांबळे, आगरगावचे सरपंच प्रविन राऊत, पोलीस पाटील सागर खोडे, लोणीचे सरपंच वैभव श्यामकुवर, उपसरपंच मायाताई तिरळे, कृषी सहाय्यक कु. मेसरे, मंडळ कृषी अधिकारी अतुल जावडे, तलाठी चवरे, धुमारे, तलाठी शुभम पाटील उपस्थीत होते.
आधि कोरोना व आता वर्धा जिल्हयातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अश्या दुहेरी संकटात सापडलेला आहे, वर्धा जिल्हयातील सर्व तालुक्यात सोयाबीन पिकांवर खोड अळी व अज्ञात रोग आल्याने मोठं संकट उभं राहिलं आहे. सोयाबीनवर अज्ञात रोग आल्याने शेतक-यांच्या हातची पिकं गेली असून त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. सर्व सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या शेतात प्रत्यक्ष जावुन सोयाबीन पिकाचे पंचनामे करुन आर्थीक मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा तसेच ज्या शेतक-यांनी सोयाबीन पिकाचा प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विमा काढला असल्यास सदर विमा कंपणीकडेसुध्दा याबाबतचा प्रस्ताव सादर करावा तसेच संकटात सापडलेल्या सोयाबीन उत्पादक शेतक-यांना आर्थीक मदत मिळण्याच्या दृष्टीकोनातुन सहकार्य करण्याच्या सुचना उपस्थित अधिका-यांना खासदार रामदास तडस यांनी यावेळी दिल्या तसेच यावेळी मा. जिल्हाधिकारी, वर्धा व जिल्हा कृषी अधिकारी वर्धा यांच्या सोबत खासदारांनी दुरध्वनीव्दारे सोयाबीन पिकाच्या नुकसानाबाबतची चर्चा केली व शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याबाबत लवकरण निर्णय घेण्याबाबत सुचना केल्या तसेच केन्द्रीय कृषी मंत्री यांच्याकडे व लोकसभा अधिवेशन मध्ये विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे यावेळी खासदार तडस म्हणाले.