Breaking News

राष्ट्रसंत परमपूज्य वंदनीय डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांना शिवा संघटना वर्धा जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजलि अर्पण

Advertisements
वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :-आ.राष्ट्रसंत परमपूज्य वंदनीय डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांचा जन्म  25 फरवरी 1917 ला झाला असून ते केवळ महाराज म्हणूनच सीमित राहिले नाहीत तर स्वतः 1945 ला लाहोर विद्यापीठातून त्यांनी mbbs चे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरची पदवी त्यांनी प्राप्त केली आणि शैक्षणिक दृष्ट्या लिंगायत समाजासाठी ते भूषण ठरले अलीकडे त्यांचे वयाच्या 104 व्या वर्षी म्हणजेच 1 सप्टेंबर 2020 ला ते शिवैक्य झाले. शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांंनी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळी रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2020 ला सकाळी ठीक 11 वाजता राष्ट्रसंत परमपूज्य वंदनीय डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करण्याचे आवाहन केेले होतेे. तसेच आज दि.6 सप्टेंबर 2020 रोजी शिवा संघटना वर्धा जिल्हा तर्फे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.राष्ट्रसंत परमपूज्य वंदनीय डॉ शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पन करून पूजन व आरती करून दोन मिनिटं मौन बाळगून श्रद्धांजली चा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्रद्धांजलीच्या या कार्यक्रमाला शिवा संघटनेचे माजी वर्धा जिल्हा प्रमुख विजयराव माजरखेडे, जिल्हाप्रमुख सुरेश पट्टेवार ,जिल्हा संघटक गजानन बाजारे, शहर अध्यक्ष विजय पुणेवार,राजेंद्र काचेवार , अविनाश कोमलवार , राजेंद्र काळे , मायाताई विजय पुणेवार हेे उपस्थित होते.तसेच जिल्ह्यातील समाज बांधवांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आप आपल्या घरीच राष्ट्रसंत परमपूज्य वंदनीय डॉ शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

रामनामाने नागपूर दुमदुमले, दीपोत्सव साजरा : अयोध्येत सकाळपासून भाविकांच्या रांगा

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्‍लाची काल सोमवार (२२ जानेवारी) रोजी प्राणप्रतिष्‍ठा करण्यात आली आहे. देशभरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *