Breaking News

…अन्यथा बेकायदेशीर बांधकाम पाडू, मुंबई महापालिकेची कंगनाला नोटीस

Advertisements

मुंबई महापालिकेने बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी अभिनेत्री कंगना राणौतला नोटीस पाठवली आहे. कंगनाने खार पश्चिम येथील आपल्या कार्यालयात बेकायदेशीर बदल केले असून बांधकाम केल्याचा आरोप महापालिकेने केला आहे. पालिकेने कंगनाला २४ तासांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. कंगना उत्तर देण्यास अपयशी ठरल्यास बेकायदेशीर बांधकाम पाडलं जाईल असं पालिकेने नोटीसमध्ये कळवलं असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

Advertisements

दरम्यान सोमवारी कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सुरु झालेल्या वादामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दखल दिल्याचा दावा कंगाने केला होता. ट्विटरवरुन कंगनाने आपल्या मुंबईतील ऑफिसमध्ये महापालिकेचे काही अधिकारी आले होते आणि त्यांनी ऑफिसमधील जागेचे मोजमाप घेऊन उद्या बांधकाम पाडणार असल्याचं सांगितल्याचा दावा कंगनाने केला होता. महापालिकेचे अधिकारी ऑफिसमध्ये आल्याचे काही व्हिडिओ कंगनाने ट्विटरवरुन पोस्ट केले होते.

Advertisements

महापालिकेचे अधिकारी आपल्या ऑफिसमध्ये बळजबरीने शिरल्याचा आरोप कंगनाने केला होता. यासंदर्भात तिने तीन ट्विट केले होते. पहिल्या ट्विटमध्ये तिने आपल्या ऑफिसबद्दल माहिती दिली होती. “हे माझं मुंबईमधील मणिकर्णिका फिल्मचे ऑफिस आहे. १५ वर्ष मेहनत करुन मी हे उभं केलं आहे. जेव्हा मी चित्रपट निर्माती होईन तेव्हा माझं स्वत:चं ऑफिस असावं असं माझं स्वप्न होतं. मात्र आता माझं हे स्वप्न तुटताना मला दिसत आहे. माझ्या ऑफिसमध्ये अचानक मुंबई महानगरपालिकेचे काही लोकं शिरले आहेत,” असं कंगनाने पाहिल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

दुसऱ्या ट्विटमध्ये तिने बळजबरीने ऑफिसमध्ये घुसून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप घेतल्याचा दावा केला होता. “ते बळजबरीने माझ्या ऑफिसात घुसले आणि सर्व गोष्टींची मोजमाप करु लागले. माझ्या शेजाऱ्यांनाही त्यांनी त्रास दिला. जेव्हा त्यांनी यासंदर्भात तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा, ‘त्या मॅडमच्या कृत्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत’ अशी भाषा अधिकाऱ्यांनी वापरली. उद्या ते येथील काही भाग तोडणार असल्याचे मला सांगण्यात आलं आहे,” असं कंगनाने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

पुढच्या ट्विटमध्ये तिने आपल्याकडे या संपत्तीसंदर्भातील सर्व कागदपत्रं असल्याचं स्पष्ट केलं होतं. “माझ्याकडे यासंदर्भातील सर्व कागदपत्रं आणि मुंबई महानगरपालिकेच्या सर्व परवानग्या आहेत. माझ्या मालकीच्या या जागेवर काहीही अनधिकृतपणे बांधण्यात आलेलं नाही. मुंबई महानगरपालिकेने मला स्ट्रक्चरल प्लॅन पाठवावे तसेच अनधिकृत बांधकामासंदर्भातील नोटीस पाठवावी. मात्र त्यांनी आज माझ्या ऑफिसवर छापा टाकला आणि उद्या कोणतीही नोटी न देताना ते बांधकाम पाडणार आहेत,” असं कंगनाने म्हटलं होतं.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

सद्गुरु जग्गू वासुदेव यांच्या इशा फाऊंडेशनमधून ६ लोक बेपत्ता

आध्यात्मिक सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा तमिळनाडूमधील कोइम्बतूर याठिकाणी इशा फाऊंडेशन नावाची संस्था आहे. या ठिकाणाहून …

सड़क व भवन निर्माता कंपनियों ने बिना परमिशन के हीं खुदाई करवा दी नागपूर के सुरादेवी की पहाडी? सरकार को करोडों की चपत

सड़क व भवन निर्माता कंपनियों ने बिना परमिशन के हीं खुदाई करवा दी नागपूर के …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *