Breaking News
रामदास तडस - वर्धा खासदार

पशु संवर्धन विभाग मार्फत विविध ठिकाणी लसीकरण शिबीर आयोजन करून पशु पालकांना मार्गदर्शन करावे – खासदार रामदास तडस

Advertisements

देवळी:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- जिल्ह्यातील नागरिक कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने त्रस्त झाले असताना ‘लंपी’ नावाच्या आजाराने जनावरांनाही घेरले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे ‘लंपी’ असे विदारक चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. गोचीड, गोमाशी किंवा आजारी जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांमध्ये लंपी स्कीन डिसीस या साथीच्या आजाराने शिरकाव केला आहे. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी जनावरांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पशु संवर्धन विभाग वर्धा व्दारा रत्नापूर पशुवैद्यकीय आरोग्य शिबीर आयोजित करुन जनावरांच्या पावसाळ्यातील रोगावर नियंत्रणाकरिता प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. आणि सोबतच पशु पालकांना लसीकरणाचे महत्व ही समजावून सांगितले. यावेळी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी वर्धा डाॅ. प्रज्ञा डायगव्हाने, रत्नापूरचे सरपंच शाहीन अयुब अली, प.वि.अ.डाॅ.कोकरे, सहाय्यक आयुक्त डाॅ. अलोने, पाटील, कांबळे, उपसरपंच शालीक मांगुळकर, ग्रामसेवक कु. आडे, सदस्य सुधिर बोबडे, सदस्य उमेश कुमरे, माजी सरपंच अयुब अली, सौरभ कडू व पशुपालक उपस्थित होते. या शिबीरामध्ये 300 जनावरांची तपासनी करण्यात आली असुन यामध्ये 200 जनावरांना लसीकरण करण्यात आले व 100 जनावरांना औषध उपचार करण्यात आला.

Advertisements

       देशासह राज्यात गेल्या पाच महिन्यापासून कोरोना विरूद्धची लढाई सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनावर अद्यापही कुठलीही लस नसल्याने माणसातील प्रतिकार शक्ती वाढविण्यावरच भर दिला जात आहे. वर्धा जिल्हयातही दररोज शेकडो रूग्णांची भर पडतांना दिसत असतांनाच आता जनावरांमध्येही संसर्गजन्य आजाराने शिरकाव केल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना, सोयाबीन व जनावरांना लंपी आजार या तिहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे, संकटात सापडलेल्या शेतक-यांना मदत करने सर्वाचे कर्तव्य आहे, यासाठी लंपी रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी पशु संवर्धन विभाग मार्फत विविध ठिकाणी जनावरांसाठी विशेष लसीकरण शिबीर आयोजीत करून पशु पालकांना मार्गदर्शन करावे असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

Advertisements

       लंपी या स्कीन डिसीज चा प्रसार  होऊ नये यासाठी जिल्हयात विविध ठिकाणी विशेष लसीकरण मोहीम राबविली जात असुन या लसीचा मुबलक साठा उपलब्ध आहे, जिल्हयात आतापंयत 39 हजार पेक्षा जास्त जनावरांना प्रतिबंधात्क लस देण्यात आलेली आहे, तसेच सर्व शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जावून सुध्दा लाभ घेऊ शकता,  तसेच पशुपालकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी तसेच जनावरांचा गोठा नियमीत फवारा मारुन साफ करण्याच्या सुचनाही यावेळी डाॅ. प्रज्ञा डायगव्हाने यांनी पशुपालकांना केल्या.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

जरांगेचा सरकारवर दबाव : हायकोर्टात याचिका

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासह आयोगाच्या इतर सदस्यांच्या नियुक्तीला जनहित …

लोकसभा चुनाव कब होंगे? चीफ इलेक्शन कमिश्नर राजीव कुमार ने दिया बड़ा अपडेट

2024 लोकसभा चुनाव को लेकर चुनाव आयोग से तैयारियां पूरी कर ली हैं। मुख्य चुनाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *