देवळी येथे पंतप्रधान मा. श्री. नरेन्द्रजी मोदी यांचा 70 वा वाढदिवस हा ‘‘सेवा सप्ताह’’ अंतर्गत विविध उपक्रम घेऊन साजरा

 

देवळी मिरन्नाथ मंदिर परिसरात मध्ये स्वच्छता मोहीम, मास्क वाटप, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली

वर्धा प्रतिनिधी : देवळी: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा यांनी आदरणीय लोकप्रीय पंतप्रधान मा. श्री. नरेन्द्रजी मोदी यांचा 70 वा वाढदिवस हा 14 ते 20 सप्टेंबर 2020 पंर्यत ‘‘सेवा सप्ताह’’ साजरा करण्याच्या सुचना केल्या यामध्ये वंचितांना मदत, गरीबांना फळाचे वाटप, प्लाझमा दान, रक्तदान शिबीर, वृक्षारोपन, स्वच्छता अभियान समावेश आहे.

       वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी संपुर्ण वर्धा लोकसभा क्षेत्रात  मोठया प्रणाणात भारताचे लोकप्रीय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी यांचा जन्मदिवस ‘‘सेवा सप्ताह’’ साजरा करण्याच्या सुचना सर्वांना दिलेल्या होत्या. या अनुषंगाने आज दिनांक 17 सप्टेंबर 2020 ला देवळी शहर आणि ग्रामीण मंडळ कडुन माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या 70 व्या जन्मदिनानिमित्य ‘‘सेवा सप्ताहाचे’’ आयोजन करण्यात आले आज श्री मिरन्नाथ मंदिर परिसरात मध्ये स्वच्छता मोहीम, मास्क वाटप, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली या वेळी जिल्हा अध्यक्ष श्री शिरीषजी गोडे साहेब, न.प. देवळी अध्यक्षा सुचिताताई मडावी, भाजपाचे महामंत्री मिलिंदजी भेंडे, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, सभापती संगीता तराळे, देवळी ग्रामीण मंडळ अध्यक्ष दशरथ भुजाडे, देवळी शहर अध्यक्ष रविंद्र कारोटकर, देवळी महिला आघाडी शुभांगीताई कुर्जेकर, न.प.सदस्य सारीका लाकडे, न.प.सदस्य सुनिता बकाने, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अंकित टेकाडे, ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष रवि भणारकर,  ग्रामीण सोशल मिडीया प्रमुख अमोल इंगोले,  शहर सोशल मिडीया प्रमुख निखील कावळे, नारायण सुरकार, ज्योती खाडे, माया वडेकर, सरपंच गजानन हिवरकर, सरपंचत वैभव श्यामकुंवर, हरिष बोरकर, व देवळी शहर पदाधिकारी दिनेश वैद्य, दीपक घोडे, सुरज कानेटकर, विपीन पिसे, हरीष तडस, उमेश कामडी, दीपक कामडी, सुरज पडोळे, प्रवीण पाटील, संतोष बियाला, किरण तेलरांधे, मनोज बकाने, विनोद तेलरांधे, गजानन सावरकर,  अनिल डफरे, सुनिल ढगे, गोपाल राळेकर, अमोल चनेकर व समस्थ भाजपा, भाजपा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला

राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!

‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *