चंद्रपूर : सामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडून अल्पावधीतच जनसामान्यांच्या आपल्याशा वाटणाऱ्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे नव्या २ जबाबदाऱ्या आल्या आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांची पंचायत राज समिती, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
महिलाचे व ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे प्रश्न आमदार प्रतिभाताई धानोरकर नेहमी दूर करीत असतात. मतदार संघातील महिलांच्या समस्या दूर करण्याकरिता त्या नेहमी आग्रही राहतात. त्याच प्रमाणे मतदार संघ हा ग्रामीण असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध समस्या व विकासाच्या दृष्टीने त्या कार्य करीत असतात.
याच कार्याची दखल घेत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांची पंचायत राज समिती, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. महाआघाडी सरकारचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आभार मानले आहे.
त्यांच्या या नियुक्तीच्या जिल्ह्यातून स्वागत करण्यात येत आहे. पुढील काळात अन्य महत्वाच्या जबाबदारी पार पाडण्याकरिता त्यांना शुभेछा दिल्या जात आहे.
Check Also
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?
महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …