आमदार किशोर जोरगेवार यांची विधानभवन पंचायत राज समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

चंद्रपूर : विधानभवन पंचायत राज समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली असून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना या समितीत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळत राज्याचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांनी अधिवेशना दरम्याण सातत्याने चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे प्रश्न मांडत सभागृहात आपली ओळख निर्माण केली. याचीच दखल घेत त्यांची आता विधानभवन पंचायत राज समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अन्न मागास क्षेत्राचा विकासासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जातो. सदर निधीचा योग्य विकास कामावर वापर केल्या जातो कि नाही यावर लक्ष ठेवण्याचे काम सदर समितीच्या वतीने केल्या जात असते. या समितीला विधानसभा सभागृहात विशेष अधिकार आहे.
त्यामूळे या महत्वाच्या समितीवर चंद्रपूचे आमदार किशोर जोरगेवार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *