Breaking News

घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास अटक

Advertisements

वर्धा प्रतिनिधी :- पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दिनांक 06.11.2020 रोजी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे दिनेश बुधुलाल कैथवास वय 40 वर्षे रा . सावरकर लेआउट , दयाल नगर , वर्धा यांनी रिपोर्ट दिला की दिनांक 04.11.2020 चे सकाळी 07.00 वा . दरम्यान घराला कुलुप लावुन रोज मजुरीचे कामाला गेला असता व कामावरून सायंकाळी 07.00 वा परत घरी आला असता त्यास घराचे दरवाज्याला लावुन असलेले कुलुप तुटलेले दिसले त्या वरून फिर्यादीने घरात जावुन पाहले असता तर घरातील किचनरूम मधुन गॅस ओटयाखाली ठेवुन असलेले एक HP कंपनीचे घरघुती गॅस सिलेन्डर कीमंत 2000 रू चा दिसुन आले नाही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने पो.स्टे.वर्धा शहर येथे फिर्यादीचे रिपोर्ट वरून अप क्रमांक 1186/2020 कलम 454,380 भा . द.वि चा गुन्हा नोंद झाला असुन तपासवर आहे . सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान तातडीने गंभीर दखल घेवुन तपास सुत्रे हलविल्या मुळे बातमीदारा कडुन मिळालेल्या बातमी नुसार तपास कार्यवाही केली असता संदीप फुलचंदजी कैथवास वय 33 रा.स्टेशनफैल वर्धा यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांने गुन्हयाची कबुली दिली असुन गुन्हयातील चोरलेले एक HP कंपनीचे घरघुती सिलेन्डर कीमत 2000 रू जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आला आहे . सदरची कार्यवाही मा . पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर , मा . पियुश जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार , तसेच डी.बी. चे पथकाने जमदार पो.हवा , दिवाकर परीमल , ना.पो.शि सुभाष गावड , पो.शि पवन निलेकर , यांनी सदर चोरटयाचा यशस्वी रित्या शोध घेवुन अटक कार्यवाही करून मुददेमाल जप्त केलेला आहे . पुढील तपास कार्यवाही ना.पो.शि.सुभाष गावड करीत आहे .

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *