Breaking News

अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून हे भाजपचे षडयंत्र

Advertisements
  • अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणूनच हे षडयंत्र!
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला गंभीर आरोप.
  • इतकी सुरक्षा असूनही ती गाडी अंबानींच्या घरापर्यंत पोहचलीच कशी?
  • मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही. तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

    मुकेश अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकारची आणि त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी?, असा प्रश्न नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला.

    Advertisements

    २००९ मध्ये अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू दुसऱ्याच दिवशी झाला होता, याची आठवणही पटोले यांनी करून दिली. राज्यात व देशात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भाजप आमदारांनी या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला असेही पटोले म्हणाले.

    Advertisements

    मुंबईत मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांसह एक स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यात संबंधित स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरन यांनी आत्महत्या केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. राज्य सरकारने दोन्ही घटनांचा तपास एटीएसकडे दिला असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने यात एंट्री घेत स्फोटकांप्रकरणी तपास राष्टीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राज्य विधीमंडळात तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्ष भाजपने सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. त्यावरूनच नाना पटोले आक्रमक झाले असून त्यांनी या विषयी बोलताना भाजपवर पलटवार केला आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

रामनामाने नागपूर दुमदुमले, दीपोत्सव साजरा : अयोध्येत सकाळपासून भाविकांच्या रांगा

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्‍लाची काल सोमवार (२२ जानेवारी) रोजी प्राणप्रतिष्‍ठा करण्यात आली आहे. देशभरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *