देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राच पहिल्य क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद पार पडली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे”.
“दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे.” असं राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं.
“याशिवात गुजरात, मध्य प्रदेशातही चिंताजनक स्थिती आहे. गुजरातमध्ये दिवसाला १७०० तर मध्य प्रदेशात १५०० रुग्ण सापडत आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण आहेत,” अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली.