Breaking News

वीज कपात करण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना डांबले ग्रामपंचायतीत

Advertisements

वीज कपात करण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना डांबले ग्रामपंचायतीत
नागभीड-
तालुक्यातील किटाडी (बो.) ग्राम पंचायतचे सरपंच छगन कोलते यांच्या नेतृत्वात पाणीपुरवठा योजनेची वीज कपात करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या कर्मचार्‍यांना ग्रामपंचायमध्ये डांबण्यात आल्याने कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
छगन कोलते यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षापासून किटाडी येथे विद्युत रोहित्राची मागणी करण्यात येत होती. परंतु, वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत होते. मात्र, 25 मार्चला ग्राम पंचायतकडे पाणीपुरवठा योजनेचे थकित वीज देयक असल्याच्या कारणाने कर्मचारी वीज कपात करण्यासाठी आले. पाणी समस्या लक्षात घेता वीज कापू नये, वीज देयकाचा भरणा करण्यात येईल, मात्र चार वर्षापासूनची असलेली आमची मागणी मान्य करा, अशी मागणी सरपंचांनी लावून धरली.
यावेळी कर्मचारी व सरपंच यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर कर्मचार्‍यांना ग्रामपंचायतमध्ये डांबून ठेवण्यात आले. तब्बल 1 तास डांबून ठेवल्यानंतर नागभीड पोलिस व महावितरणचे कर्मचारी ग्रामपंचायतमध्ये पोहचले. याबाबत कळताच आ. बंटी भागडीया यांनी दूरध्वनीवरून नागभीडचे अभियंता कारगावकर यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर डांबून ठेवण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची सुटका करण्यात आली. थकित पाणीपुरठ्याचे वीज देयक लवकरच भरण्यात येईल मात्र किटाडी येथील चार वर्षाची मागणी त्वरित पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी छगन कोलते यांनी यावेळी केली.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *