माझी वसुंधरा अभियानांतर्गत इलेक्ट्रीक वाहने व सोलर उपकरणांच्या प्रदर्शनीचे आयोजन

 चंद्रपूर ३१ मार्च – माझी वसुंधरा अभियानांतर्गत वायु प्रदूषण कमी करणे व पर्यावरणपुरक वाहनांना प्रोत्साहन देणे तसेच अपारंपारीक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे इलेक्ट्रीक वाहने व सोलर उपकरणांच्या प्रदर्शनीचे आयोजन ३१ मार्च रोजी मनपा मुख्य इमारत परीसरात करण्यात आले होते.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वावर आधारीत माझी वसुंधरा अभियान महानगरपालिका क्षेत्रात २ ऑक्टोबर ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत राबविले जात आहे  मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार, मा. सभापती स्थायी समिती श्री. रवी आसवानी यांनी सदर प्रदर्शनीला भेट देऊन इलेक्ट्रीक वाहने व सोलर उपकरणांची माहीती घेतली. वायु प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रीक वाहने प्रदर्शनी एस. आर मोटर्स यांच्या सहकार्याने तर अपारंपारीक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देण्याकरीता सोलर उपकरणांची प्रदर्शनी चंद्रपूर महानगरपालिका, हसन सोलर व सनराईज पवार सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित करण्यात आली होती. कोरोना नियमांचे पालन करून पार पडलेल्या या प्रदर्शनीला मोठ्या प्रमाणात नागरीकांचा सहभाग लाभला.
पंचतत्वावर आधारीत या अभियानात पृथ्वी तत्वाच्या अनुषंगाने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी  व्यवस्थापन तसेच वायू तत्वाकरिता प्रदूषण कमी करून हवा गुणवत्तेत सुधारणा करणेविषयी केलेल्या कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे. जल तत्वाकरिता जलस्त्रोतांचे संरक्षण, स्वच्छता व संवर्धन, सागरी जैव विविधता अशा गोष्टींचे आणि अग्नी तत्वाकरिता उर्जेचा योग्य वापर, उर्जा बचत, उर्जेचा अपव्यय टाळण्यास प्रोत्साहन देणे तसेच अपारंपारिक उर्जा निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे अशा बाबी राबविल्या जात आहेत . पाचवे आकाश तत्व हे स्थळ व प्रकाश या स्वरूपात निश्चित करून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे जनजागृतीपर उपक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रम राबविणे याविषयी केलेल्या कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे.
याप्रसंगी उपायुक्त श्री.विशाल वाघ, श्री. राहुल घोटेकर, श्री. संदीप आवारी,  श्री. सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका सौ छबूताई वैरागडे, आकाश निंबाळकर, सहायक आयुक्त विद्या पाटील, शीतल वाकडे व अधीकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *