फेज़बुकवरील “फेक आयडी” धारक योद्धा ठरतोय डोकेदुखी.

 फेज़बुकवरील “फेक आयडी” धारक योद्धा ठरतोय डोकेदुखी. 
(गडचांदूरात मोठे रॅकेट सक्रिय,सायबर सेल लक्ष देतील का ?)
कोरपना ता.प्र.:-
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले डिजिटल इंडियाचे स्वप्न हळुहळू साकार होताना दिसत आहे.शासकीय निमशासकीय कार्यालयात मोठ्याप्रमाणात डिजिटल पद्धतीने कामकाज सुरू आहे.पूर्वी बँकेतून पैसे काढणे किंवा जमा करणे,रेशन कार्ड,ड्रायव्हिंग लायसेन्स इतर कामे आफलाईन होत होती.यासाठी नागरिक संबंधित कार्यालयात रांगा लावायचे.परंतू आता हीच कामे आनलाईन पद्धतीने होत असून शिक्षण आनलाईन झाले,आर्थिक व्यवहार गुगल पे,फोन पे,एटीएम द्वारे होत आहे.बरेचशे व्यवहार डिजिटल झाल्याने फसवणुकीचे सुद्धा प्रकरण पुढे येत आहे.एकुणच हल्ली डिजिटल पद्धतीने कामे सुरू आहे.या पार्श्वभूमीवर एक विचित्र प्रकार पूढे आला आहे.काही नागरिकांनी फेज़बूकवर फेक आयडी बनवून लोकांना वेठीस धरण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला आहे.वास्तविक पाहता आयडी बनवताना संबंधितांनी माहिती नमूद करणे गरजेचे असते.मात्र स्वतःची ओळख लपवून इतरांच्या पोस्ट विषयी अनावश्यकरीत्या बोचरी टीका टिप्पणी केली जात आहे.लोकशाही मध्ये सर्वांना बोलायचं अधिकार आहे मात्र पडद्या आड राहून टीका करणं हे कितपत योग्य. कदाचित यांना समोर येऊन बोलण्याची हिंमत नसेल म्हणूनच(खोटी)फेक आयडी तयार करून फेज़बूकच्या माध्यमातून समोरच्या व्यक्ती विरूद्धचा द्वेष,राग व्यक्त करीत आहे.
         कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर शहरात अशा पद्धतीची फेक आयडी तयार करून विवीध प्रकारे कमेंट करून मनस्ताप देणारी तथाकथित योद्धांची टोळी फेज़बूकवर सक्रिय असून यांना शहरातील नागरिकांची पुरेपूर माहिती असल्याने ही मंडळी स्वतःची ओळख लपवून सर्वसामान्य नगरिकांसह नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष,काही नगरसेवक,पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांच्या फेज़बूक पोस्टवर मनाला टोचणारे कमेंट करीत आहे.अशा कृत्यांमुळे संबंधितांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.फेक आयडी धारक योद्धा चितपरिचित असल्याची खात्री असूनही नेमके ते कोण ? याविषयी संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा पडद्या आड लपलेल्या विकृत मानसिकतेचे शिकार असलेल्या योद्धांना काय उत्तर द्यायचं अशी भावना व्यक्त होत आहे.”तोंडापुढे गोड बोलून काटा काढायचा” असला हा प्रकार असून सायबर सेलच्या संबंधित अधिकार्‍यांनी फेज़बूकवरील फेक आयडी बनवणाऱ्यांची व्यवस्थितपणे माहिती घेऊन कारवाई करावी जेणेकरून लोकांना होणारा मनस्ताप थांबेल अशी मागणी वजा विनंती या प्रकारामुळे कंटाळलेल्या नागरिकांनी केली आहे.संबंधित विभागाने अशाप्रकारे बेकायदेशीर फेक आयडी बनवणाऱ्यांचे वेळीच मुस्के न आवळल्यास भविष्यात निष्पाप नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तेव्हा याकडे जिल्हा सायबर सेलने लक्ष घालून कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी

शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *