Breaking News

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणी चार वाहनांवर प्रशासनाची कारवाई

Advertisements

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणी चार वाहनांवर प्रशासनाची कारवाई

Advertisements

चंद्रपूर,दि. 17 मे :अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हयात संभाव्य गौण खनिज चोरी होणाऱ्या ठिकाणी आकस्मित धाडी टाकून अवैध खनिज उत्खनन व वाहतुक करणाऱ्या व्यक्तीवर व वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता – 1966 च्या कलम 48 च्या पोट कलम (7) (8) च्या तरतुदीन्वये  दंडात्मक कार्यवाही करण्यात येते.

Advertisements

जिल्हयात रेतीघाटातील अवैध उत्खनन व वाहतूकीबर उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांचे मार्फत नियंत्रण ठेवण्यात येते. वाळू,रेती निर्गती सुधारीत धोरण, 2019 नुसार अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरीता उपविभागीय स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधीत तहसिलदार, प्रादेशीक परिवहन अधिकारी यांचा प्रतिनीधी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत तहसिलदार यांचा समावेश असलेली समिती गठीत केलेली आहे, तालुका स्तरावर तहसिलदार, उप अधिक्षक भूमी अभिलेख, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नायब तहसिलदार (महसूल) यांचा समावेश असलेली समिती गठीत केलेली आहे. तसेच ग्राम पातळीवर ग्राम पंचायतीचे सरपंच, ग्राम सेवक, पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी यांचा समावेश असलेली गठीत केलेली आहे.

जिल्हा भरारी पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता दिनांक 13/05/2021 रोजी सकाळी 4:15 वाजता जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथील जिल्हा भरारी पथक बल्लारपूर दौऱ्यावर असतांना मौजा बामणी ता. बल्लारपूर येथील वर्धा नदीपात्रामध्ये अवैध रेती, वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. सदर वाहनाची तपासणी करण्यात येवून विना परवाना रेती वाहतूक करणारे रामु बंडी रा. बल्लारपूर यांचे वाहन ट्रॅक्टर क्र. एम.एच.34 ए.पी – 2911, पप्पू घोडाम, रा. अमित नगर, बल्लारपूर यांचे वाहन ट्रॅक्टर एम.एच.34 बी.एफ 9422, आरोफ शेख, रा.अमित नगर बल्लारपूर यांचे वाहन ट्रॅक्टर एम.एच.34 एल – 9998, व महेंद्र डाखरे, रा.बल्लारपूर यांचे नंबर नसलेला एक वाहन ट्रॅक्टर असे एकूण 04 ट्रॅक्टर जप्त करून .शंकर खरुले, तलाठी कळमना, तहसिल कार्यालय बल्लारपूर यांचेकडे सुपूर्दनाम्यावर सुपूर्द करण्यात आलेले आहे. उक्त वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 48 च्या पोट कलम (7) (8) च्या तरतुदीन्वये पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *