परीक्षा शुल्क माफ करा, अन्यथा आंदोलन – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा इशारा

चंद्रपूर,
विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा व महाविद्यालयीन शुल्क माफ करावे, अन्यथा आभासी पद्धतीने आंदोलन करू, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे. मागण्यांचे निवेदन विद्यापीठाच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढले आहे. राज्यासह जिल्ह्यात टाळेबंदी लागू आहे. त्यामुळे पालकांच्या हाताला काम नाही. परिणामतः सर्वच घटकांतील लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बिकट स्थितीत विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय शुल्क व विद्यापीठ उन्हाळी परिक्षेचे शुल्क आकारल्या जात आहे.
महाविद्यालयीन शुल्क कमी करावे आणि विद्यापीठ परिक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले आहे. या मागण्यांचे निवेदन विद्यापीठाचे कुलगुरू व शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आले आहे. आभासी पद्धतीने होणार्‍या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन अभाविपचे जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले, महानगर सहमंत्री शैलेश दिंडेवार यांनी केले आहे.

About Vishwbharat

Check Also

तरुणांना प्रशासनासोबत कामाची संधी : ६० हजार रुपये वेतन

राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत …

12 वीं पास युवाओं के लिए 15 हजार पदों पर निकली भर्ती

12 वीं पास युवाओं के लिए 15 हजार पदों पर निकली भर्ती टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *