Breaking News

तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने केला हल्ला

भद्रावती,
जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन व शेतोपयोगी साहित्य आणण्यासाठी जंगलात गेलेल्या ग्रामस्थांवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात दोन महिलांचा आणि एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. या तिन्ही घटना बुधवार, 19 मे रोजी भद्रावती तालुक्यातील आयधुनिर्माणी जंगल परिसर, सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी दिवाण तलाव परिसर तसेच सावली तालुक्यातील मंगर मेंढा परिसरात घडल्या. या वेगवेगळ्या घटनांत रजनी भालेराव चिकराम (रा. घोटनिंबाळा), सीताबाई चौके (रा. पेंढरी कोकेवाडा), रामा मारबते (रा. निफंद्रा) यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भद्रावती तालुक्यातील तालुक्यातील घोट निंबाळालगतच्या रजनी भालेराव चिकराम ही महिला आयुधनिर्माणी जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेली होती. या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. वाघ दिसताच सहकारी महिलांची भंबेरी उडाली. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पुढील तपास भद्रावती पोलिस व वनविभाग करीत आहेत.

तर, दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव जवळील पेंढरी येथील दिवाण तलाव परिसरात घडली. कोकेवाडा-पेंढरी येथील महिला सीताबाई गुलाब चौके या महिलेवर वाघाने हल्ला केला. त्यात ती मृत्यूमुखी पडली. ही महिलाही तेंदूपत्ता संकलनासाठी गेली होती. घटनेची माहिती कळताच सिंदेवाही व नवरगाव येथील पोलिस व वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. संचारबंदीत ग्रामस्थांचे रोजगार ठप्प झाल्याने आता ते तेंदूपत्ता संकलनाचे कार्य करीत आहेत. मात्र तरीही पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाजवळ येत असल्याने गावकर्‍यांनी जंगल परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

तसेच तिसरी घटना सावली तालुक्यातील मंगरमेंढा जुन्या फिल्टर लाईन परिसरात घडली. या तालुक्यातील निफंद्रा येथील रामा मारबते हा इसम बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास शेतोपयोगी लाकूड आणण्यासाठी गेला होता. तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून तिला ठार केले. या तिन्ही घटनांनी जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष चांगलाच पेटल्याचे चित्र दिसू लागले आहे.
 वाघाचा वनपथकावर हल्ला, वनरक्षक जखमी
सावली वनपरिक्षेत्रातील गेवरा नियतक्षेत्रात वनपथक गस्तीवर असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. यात वनरक्षक गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवार, 19 मे रोजी सकाळच्या सुमारास घडली. संदीप चुधरी असे जखमी वनरक्षकाचे नाव असून, त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी गेवरा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 154 मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जखमी केले होते. त्या महिलेवर सध्या गडचिरोली येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वाघाला शोधण्यासाठी वनपथक तैनात करण्यात आले होते. हे पथक गस्तीवर असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. अन्य वनकर्मचार्‍यांनी आरडाओरड केल्याने या वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. जखमीला सावली ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ हलविले. पण प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *