Breaking News

नगर परिषद गडचिरोली व चामोर्शी – धानोरा नगर पंचायतीना मिळणार लवकरच शववाहिका

Advertisements

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठपुराव्याला यश

Advertisements

नगर परिषद व नगर पंचायत यांना शववाहिका करिता निधी मिळाल्याने शववाहिका घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी

Advertisements

गडचिरोली नगर परिषद, धानोरा व चामोर्शी नगर पंचायत क्षेत्रातील मृतकांच्या परीवारांना होणारा नाहक त्रास कमी होणार

दिनांक २७ मे २०२१ गडचिरोली

गडचिरोली नगर परिषद व चामोर्शी तसेच धानोरा येथील नगर पंचायतींना प्रत्येकी एक शववाहिका शासनाकडून मिळावी याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून त्यांना प्रत्येकी १ शववाहिका खरेदी करिता निधी प्राप्त झाला आहे त्यामुळे लवकरच गडचिरोली नगर परिषद ,धानोरा व चामोर्शी नगर पंचायतींना शववाहिका मिळणार आहेत
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात केवळ गडचिरोली नगरपरिषद येथे शववाहिका -स्वर्ग रथाची व्यवस्था आहे .त्यामुळे परिसरातील कोणत्याही गावात मृत्यू झाल्यास येथील व्यवस्थेवर ताण येत होता. परिणामी या क्षेत्रातील मृतकांच्या परिवारांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.त्यामुळे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी नगर परिषद गडचिरोली ,चामोर्शी तसेच धानोरा येथील नगर पंचायतींना प्रत्येकी एक शववाहिका शासनाकडून मिळावी याकरिता पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून गडचिरोली, चामोर्शी व धानोरा नगर पंचायत करिता प्रत्येकी १ शववाहिका खरेदी करिता निधी प्राप्त झाला आहे. निधी प्राप्त झाला असल्याने नगर परिषद व पंचायत यांनी शववाहिका घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे निर्देश आमदार डॉ देवरावजी होळी यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच गडचिरोली नगर परिषद चामोर्शी तसेच धानोरा येथील नगर पंचायतींना प्रत्येकी १ शववाहिका मिळणार आहे .

Advertisements

About Vishwbharat

Check Also

शारीरिक ताकत बढाने के लिए इमली के बीज का पावडर के उपयोग के रामबाण फायदे

शारीरिक ताकत बढाने के लिए इमली के बीज का पावडर के उपयोग के रामबाण फायदे …

लैंगिक लकबा (पेनिस पिरालेसेस) नपुंसकता सहित अन्य असाध्य गुप्तरोग समस्या निवारण के लिए रामबाण वनौषधीय है अतिवला का पौधा

लैंगिक लकबा (पेनिस पिरालेसेस) नपुंसकता सहित अन्य असाध्य गुप्तरोग समस्या निवारण के लिए रामबाण वनौषधीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *