Breaking News

देवटोक येथे उत्खननात आढळली पुरातन शिवपिंड

देवटोक येथे उत्खननात आढळली पुरातन शिवपिंड
सावली-
तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनीच्या काठावर असलेल्या देवटोक येथे मंगळवार, 25 मे रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास नवीन मंदिराच्या बांधकामासाठी करण्यात येत असलेल्या उत्खननात पुरातन शिवपिंड आढळून आली.

देवटोक येथे नवीन मंदिराचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जेसीपीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. यावेळी अंदाजे 5 फूट लांबी व 1 फूट उंचीची पुरातन शिवपिंड आढळून आली. ही वार्ता परिसरात पसरताच शेकडो नागरिकांनी शिवपिंड पाहण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी केली. या शिवपिंडीची विधीवत पूजा करण्यात आली. याबाबत कळताच बुधवार, 26 मे रोजी दुपाच्या सुमारास खासदार अशोक नेते यांनी देवटोक येथे भेट दिली व शिवपिंडीची पाहणी करून पूजा अर्चना केली. तसेच सभामंडपासाठी 15 लाख रुपये देत असल्याची माहिती दिली.

यावेळी त्यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, नायब तहसीलदार सागर कांबडे, ठाणेदार शिरसाट, श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकुंडेश्वर देवस्थान ट्रस्ट देवटोक (शिर्शी) चे अध्यक्ष संत मुर्लीधर महाराज, उपाध्यक्ष पत्रू चुधरी, सचिव नरेश जकुलवार, सुरेंद्र उरकुडे, सुरज बोम्मावार, पुंडलिक पाल, नामदेव हजारे, भास्कर पोहनकार, जीबगाव ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार उपस्थित होते. यावेळी ट्रस्टच्या वतीने भक्तनिवास बांधकामासाठी निधी मंजूर करावा, या मागणीचे निवेदन अशोक नेते यांना देण्यात आले.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *