Breaking News

रोजगार

सरकारी नोकरी पाहिजे? ना परीक्षा ना मुलाखत

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही ही एक मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे.विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. आता अर्ज करण्याची तारीखही जवळ आलीये. विशेष म्हणजे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इंडिया पोस्टने …

Read More »

नागपूर हायकोर्टात पोहचला तलाठी भरती घोटाळा : राज्य शासनाला नोटीस

राज्यातील तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस बजावत चार आठवड्यात राज्य शासनाला याबाबत आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीद्वारा दाखल याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्या.अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात …

Read More »

उद्यापासून कागदपत्रे तपासणी : तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर

तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी मंगळवारी रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली. या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली होती. अंतिम निवड यादीची प्रतीक्षा होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा ही अंतिम यादी जाहीर करण्यात आली. तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात ५७ सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून दहा …

Read More »

खरंच!तलाठी नियुक्ती 26 जानेवारीला होणार का? सरकार काय म्हणते?

तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर आता येत्या आठवड्यात जिल्हानिहाय उमेदवारांची निवड यादी जाहीर होणार आहे. जात संवर्गनिहाय तसेच जिल्ह्यातील रिक्त पदांनुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या २६ जानेवारीला ही नियुक्ती पत्र देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार नियोजन सुरु आहे, अशी माहिती अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली.

Read More »

तलाठी भरतीविरोधात असंतोष : छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये लाखो परीक्षार्थी रस्त्यावर

तलाठी भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार, गुणवत्ता यादीत आलेले ‘टीसीएस’मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि सर्व प्रकरांकडे होणारे दुर्लक्ष या विरोधात परीक्षार्थीनी छत्रपती संभाजी नगर आणि बीड शहरात मंगळवारी रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त केला. भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही? लोकसेवा आयोगामार्फत केवळ २९६ रुपये शुल्क आकारले जाते, मग खासगी कंपन्या अतिरिक्त शुल्क का घेतात? परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सरकार विशेष …

Read More »

निव्वळ चर्चा आणि आरोप : तलाठी भरती रद्द केल्यास चुकीचा संदेश जाणार

तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघा सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण असल्याचे उघड झाले आहे. तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत. राज्य सरकार जाणीवपूर्वक याचा तपास न करता उलट आमच्याकडेच पुरावे मागत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. तलाठी भरती घोळ झाल्याचा पुरावा असल्यास द्यावा, असे …

Read More »

तलाठी भरती परीक्षा रद्द होणार?देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील नवीन भाजप …

Read More »

तलाठी, पोलिस, वन भरती परिक्षा रद्द करा : हायकोर्टात याचिका दाखल

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार पदांची मेगा भरती करण्यात येत आहे. त्यानुसार नियोजन आहे. परीक्षा घेण्यासाठी टी. सी. एस आणि आय.बी.पी.एस या दोन एजन्सीची निवड करण्यात आली होती. पण महाराष्ट्रात जवळ-जवळ प्रत्येक नोकर भरतीचा पेपर फोडण्यात येत असून याद्वारे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. तलाठी, पोलिस, वन भरती परिक्षा पेपर फुटलेला असल्याने या परीक्षा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल …

Read More »

बेरोजगार अभियंत्यांची ‘पीडब्लूडी’ कार्यालयावर धडक

महाराष्ट्र इंजिनीअर असोसिएशनशी संलग्नीत सुशिक्षीत बेरोजगार अभियंता कंत्राटदार असोसिएशनच्या स्थानिक शाखेच्यावतीने आज, मंगळवार, 29 ऑगस्ट रोजी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. निवेदन देऊन शासन निर्णयाप्रमाणे विविध विकास कामांपैकी 33 टक्के कामे सुशिक्षीत बेरोजगार अभियंता कंत्राटदारासाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी एक स्वतंत्र कक्ष उपलब्ध करुन देण्याचा आग्रहसुद्धा यावेळी करण्यात आला. शासन निर्णयाप्रमाणे …

Read More »

नागपूर जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती रद्द होणार? दोषी उपजिल्हाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

नागपूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर अलिकडेच घेण्यात आलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी केला आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे तक्रार दाखल केली. लिखित परीक्षेचे व मुलाखतीचे गुण वेगवेगळे घोषित न केल्याने यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मौदा उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे. …

Read More »