Breaking News

रोजगार

पोलीस भरतीतील उमेदवारांकडे सापडली औषधी द्रव्ये

पोलिस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या दोन उमेदवारांकडे रायगडमध्ये औषधी द्रव्य सापडल्याने खळबळ उडाली. यातीच एका उमेदवाराची मैदानी चाचणी शनिवारी झाली. तर दुसऱ्या उमेदवाराची चाचणी रविवारी होणार होती. मात्र, त्याची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या उमेदवाराचे रक्ताचे नमुने घेऊन मुंबई व नवी मुंबई येथील लॅबमध्ये वैद्यकीय तपासणीकता पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कोणती औषधे? …

Read More »

नोकरभरती घोटाळ्याचा पर्दाफाश! ५० हजार तरुणांची फसवणूक

पोस्ट खात्यात सहायक पोस्ट मास्टर पदासाठी बोगस भरती केली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला कुणाचा फोन आल्यास सावधान असावे. तसेच पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने चालवले जाणारे देशातील सर्वात मोठे नोकरभरती घोटाळा रॅकेट ओडिशा पोलिसांनी अलीकडेच उघडकीला आणले आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून हे रॅकेट चालवणाऱ्या बी.टेक. शिकलेल्या म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. बनावट कॉलसेंटर, बनावट वेबसाईट, शेकडो बोगस सिम कार्ड, आर्थिक …

Read More »

मृद व जलसंधारण विभागात 670 पदांसाठी भरती, मार्चमध्ये परीक्षा

मृद व जलसंधारण विभागात ‘गट ब’ (अराजपत्रित) संवर्गातील ६७० पदांची सरळसेवेने भरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. डिसेंबरमध्ये भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरू होईल. ३१ डिसेंबरपूर्वी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार असून मार्च २०२३ मध्ये परीक्षा होईल. या भरती प्रक्रियेसाठीच्या निवड समितीला ३१ डिसेंबरपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करावी लागणार आहे. उमेदवारांचे अर्ज मागविणे, परीक्षेचे ओळखपत्र पाठविण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत होईल. परीक्षेचा कालावधी १५ …

Read More »

मंत्रालयातील कर्मचाऱ्याने केली बोगस नोकर भरती

मुंबई मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याकडून लिपिकपदी नोकरी देण्याच्या आमिषाने प्रत्येकी ०६ ते १० लाख रुपये घेऊन फसवणूक सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोगस नोकर भरती रॅकेटच्या आमिषाला बळी पडलेले १० पीडित समोर आले आहेत. प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात महेंद्र सकपाळ, महादेव शिरवाळे, सचिन डोळस व नितीन कुंडलिक या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मालाडमधील रहिवासी सागर जाधव …

Read More »

वन विभागातील परीक्षा ऑनलाईनच, 15 जानेवारीपर्यंत जाहिरात

वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारीदरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. वन विभागातील पदभरतीसाठी 20 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून 10 ते 20 जानेवारीदरम्यान …

Read More »

नागपूर जिल्हा परिषदेचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ : संगणक टायपिंगच्या निकाल वाटपात विलंब!

✍️विश्व भारत विशेष नागपूर जिल्हा परिषद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. आता संगणक टायपिंग (GCC-TBC) प्रमाणपत्राचे निकाल वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. मात्र, नागपूरच्या शिक्षण उपसंचालकांना दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी निकालाच्या कागदपत्रांची फाईल वाटप करण्यासाठी नागपूरच्या माध्यमिक विभागाकडे जमा करण्यात आली होती. पण, आजपर्यंत फाईल वाणिज्य टायपिंग इन्स्टिटयूटकडे वाटप करण्यात आली नसून नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने इतका विलंब …

Read More »

हायकोर्टाने रोखली पोलीसभरतीची लेखी परीक्षा : तृतीयपंथीयांचा मुद्दा

पोलीस भरतीच्या अर्जात तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय ठेवणे कठीण असल्याचे राज्य सरकारने म्हटले होते. त्यानंतर राज्य सरकारने अखेर उच्च न्यायालयासमोर शुक्रवारी लोटांगण घातले. पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देऊ, त्यांच्या शारीरिक चाचणीसाठी फेब्रुवारीपर्यंत नियमावली बनवू अशी हमी राज्य सरकारने न्यायालयात दिली. त्यावर आता सुधारित नियमावली बनवा आणि नियमावली बनवली जाईपर्यंत पोलीस भरतीची लेखी परीक्षा घेऊ नका, असे सक्त निर्देश …

Read More »

मोदी रविवारी नागपुरात : मेट्रो स्टेशन चकाचक, 240 कॅमेऱ्यांची नजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण होणार आहे. तसेच नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजनही होणार आहे. यावेळी नागपूर रेल्वेस्थानकावर २४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. नागपूर मेट्रोने मोदी प्रवास करतील. त्यासाठी स्थानकावर स्वच्छता ठेवली जात आहे.सोबतच पोलीस विभागानेही चोख नियोजन केले असून शेकडो पोलिसांची बहुस्तरीय सुरक्षा मोदींना पुरवली जाणार आहे. पंतप्रधान ११ डिसेंबरला …

Read More »

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उद्या नागपुरात : समृद्धी महामार्गाची करणार पाहणी

पंतप्रधानांचा दौरा लक्षात घेता उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ते शिर्डी पर्यंत महामार्गाची पाहणी करणार आहेत. यानिमित्ताने काही अर्धवट कामे मार्गी लागण्याची, त्रुटी दूर होण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी नागपूरला आगमन होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समृद्धी मार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स येथून …

Read More »

राज्यात 4,122 तलाठ्यांची भरती होणार : एप्रिल-मे मध्ये नियुक्ती

राज्यातील तलाठी पदाच्या चार हजार 122 पदांची भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त एक हजार 12 आणि नव्याने निर्माण केलेल्या तीन हजार 110 या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय माहिती पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी …

Read More »