Breaking News

शैक्षणिक

टंकलेखन परीक्षेतून मिळतात वर्षाला 25 कोटी : तरीही परीक्षा शुल्क दामदुप्पट करण्याचा निर्णय

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जवळपास 20 प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यापैकी कालबाह्य मानल्या जात असलेल्या टंकलेखन अर्थात टायपिंगचाही समावेश आहे. वर्षातून दोन वेळा टकटक टायपिंग परीक्षा होते. एका वेळी 2 लाख 87 हजार परीक्षार्थी असतात. त्यांच्याकडून परीक्षा शुल्कापोटी 12 कोटी 49 लाख रुपयांचे उत्पन्न परिषदेला मिळते. वर्षाकाठी हे उत्पन्न 25 कोटींच्या घरात असते. तरीही येत्या परीक्षेपासून परिषदेने परीक्षार्थींचे शुल्क दामदुप्पट …

Read More »

पत्रकारितेमधील बारकावे आत्मसात करा : गडचिरोलीत डिजिटल मीडिया कार्यशाळा

डिजिटल मीडियासाठी बातमीचे लिखाण कसे केले जाते, एसईओ म्हणजे नक्की काय, डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली जाते, ऑनलाईन ट्रॅफिकचे तंत्र, बातम्यांचे की-वर्ड आदी महत्वाच्या विषयांवर डिजिटल मीडिया अभ्यासक व पत्रकार देवनाथ गंडाटे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावर असलेल्या संविधान सभागृहात शहरातील माध्यम प्रतिनिधीसाठी डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी बदलते माध्यम, मोबाईलमुळे झालेले बदल, …

Read More »

“डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण

टेक्नोव्हिजन मीडिया अँड कम्यूनिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित होऊ घातलेल्या देवनाथ गंडाटे लिखित “डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते अलीकडेच पार पडला. नागपुरातील वनामती सभागृहात आयोजित छोटेखाणी कार्यक्रमात डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. फिरदोस मिर्झा, तरुण भारत डिजिटलचे संपादक शैलेश पांडे, उच्च न्यायालयाचे एडवोकेट आनंद देशपांडे, डॉ. …

Read More »

चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. इंगळे यांची नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर राज्यपाल नियुक्त 10 सदस्यांच्या नियुक्त्या अलीकडेच करण्यात आल्या. महाराष्ट्राच्या कला क्षेत्रातून नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.किशोर इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपुरच्या चित्रकला महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदा सिनेट सदस्य होण्याचा बहुमान डॉ.इंगळे यांना मिळाला आहे. योगदान मोठे… डॉ. इंगळे यांचे कला क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मानही करण्यात आला आहे. त्यांच्या …

Read More »

नोकरभरती घोटाळ्याचा पर्दाफाश! ५० हजार तरुणांची फसवणूक

पोस्ट खात्यात सहायक पोस्ट मास्टर पदासाठी बोगस भरती केली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला कुणाचा फोन आल्यास सावधान असावे. तसेच पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने चालवले जाणारे देशातील सर्वात मोठे नोकरभरती घोटाळा रॅकेट ओडिशा पोलिसांनी अलीकडेच उघडकीला आणले आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून हे रॅकेट चालवणाऱ्या बी.टेक. शिकलेल्या म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. बनावट कॉलसेंटर, बनावट वेबसाईट, शेकडो बोगस सिम कार्ड, आर्थिक …

Read More »

वन विभागातील परीक्षा ऑनलाईनच, 15 जानेवारीपर्यंत जाहिरात

वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारीदरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. वन विभागातील पदभरतीसाठी 20 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून 10 ते 20 जानेवारीदरम्यान …

Read More »

नागपूर जिल्हा परिषदेचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ : संगणक टायपिंगच्या निकाल वाटपात विलंब!

✍️विश्व भारत विशेष नागपूर जिल्हा परिषद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. आता संगणक टायपिंग (GCC-TBC) प्रमाणपत्राचे निकाल वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. मात्र, नागपूरच्या शिक्षण उपसंचालकांना दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी निकालाच्या कागदपत्रांची फाईल वाटप करण्यासाठी नागपूरच्या माध्यमिक विभागाकडे जमा करण्यात आली होती. पण, आजपर्यंत फाईल वाणिज्य टायपिंग इन्स्टिटयूटकडे वाटप करण्यात आली नसून नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने इतका विलंब …

Read More »

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जळक्‍या लाकडाने अधीक्षकाकडून मारहाण

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील शिरपुंजे शासकीय आश्रम शाळेतील ६ विद्यार्थ्यांना अधीक्षक अश्विन पाईक यांनी जळती लाकडे हातात घेऊन मारहाण केली आहे. या घटनेची तक्रार आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे केली आहे. अकोले तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेमध्ये 3 डिसेंबर रोजी सकाळी शिरपुंजे आश्रमशाळेत मुलांनी कचरा जमा करून पेटविला होता. मात्र काही कचरा शिल्लक होता. त्यामुळे मुले …

Read More »

राज्यात 4,122 तलाठ्यांची भरती होणार : एप्रिल-मे मध्ये नियुक्ती

राज्यातील तलाठी पदाच्या चार हजार 122 पदांची भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त एक हजार 12 आणि नव्याने निर्माण केलेल्या तीन हजार 110 या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय माहिती पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी …

Read More »

शिक्षकाने विद्यार्थ्याच्या हातावर चालवले ‘ड्रिल’मशीन

पाढा वाचता येत नाही म्हणून एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला शिक्षा देण्यासाठी त्याच्या हातावर ड्रिल मशीन चालवले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील कानपूरमध्ये घडली. विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, शिक्षण अधिकार्‍यांची याची गंभीर दखल घेतलीय. कानपूरमधील प्रेमनगर य़ेथील प्राथमिक शाळेत विबान पाचवीच्या वर्गात शिकतो. त्याला दोनचा पाढा अनुज नावाच्या शिक्षकांनी वाचायला सांगितलं. त्‍याला पाढा वाचता आला नाही. संतापलेल्या शिक्षकाने …

Read More »