Breaking News

400 कोटींच्या गौण खनिज घोटाळ्यात अडकणार एकनाथ खडसे? चौकशी सुरु

जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाचे एटीएस पथक दाखल झाले आहे. चौकशीला प्रारंभ केला आहे. उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करत आहे. हे पथक मुक्ताईनगरात दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. या 400 कोटींच्या गौण खनिज घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधी मंडळात एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांची दखल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली होती. तसेच या प्रकरणी महसूल विभागाकडून तपास केला जाईल, असे महसूल मंत्री पाटलांनी जाहीर केले होते. या सर्व घडामोडींनंतर आता अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत.

कशी झाली जमिनीची खरेदी?

मुक्ताईनगर तालुक्यात 33 हेक्टर 41 आर जमिनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मुक्ताईनगर तालुक्यात सातोड शिवारातील 33 हेक्टर 41 आर जमिनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमिनीची खरेदी करण्यात आली. या जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान केल्याचा आरोप केला.

About विश्व भारत

Check Also

भाजपकडून मतदार यादीत घोळ : काँग्रेस लवकरच करणार घोटाळा उघड

भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना मतदानाचा समान अधिकार दिला असला तरी, सत्ताधारी भाजप सरकार निवडणूक आयोगाचा …

मंत्र्याच्या आग्रहावरून जिल्हाधिकाऱ्यांची बदली

उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका ठेवल्यापासून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद चांगलेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *