रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत झाल्याचे समोर आले होते. त्याचा उजवा हात दुखावला होता. मात्र, रोहितने मी पूर्णपणे तंदुरुस्त असून मला दुखापत झाली होती, मात्र आता मी बरा असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. पण आता रोहित नंतर संघाचा प्रमुख खेळाडू जखमी झाल्याचे वृत्त समोर आले.
रोहितनंतर विराट कोहली अॅडलेडमध्ये सराव करताना जखमी झाला. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने फेकलेला चेंडू विराटच्या मांडीवर आदळला. या घटनेनंतर कोहली जागेवरच बसला. अखेर त्याने सरावातून ब्रेक घेत काही वेळ विश्रांती घेतली. जेव्हा विराटला वाटले की आपण पुन्हा फलंदाजी करू शकतो, तेव्हा त्याने सराव करण्यास सुरूवात केली.