शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाला. शुक्रवार,सकाळी 11.40 वाजता मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काशी मिरा परिसरातील सगणाई नाका येथे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला डंपरने मागच्या बाजूने धडक दिली. सावंत हे या अपघातात जखमी झाले आहेत.
वाहतूक पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यानंतर सावंत हे स्वतः रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल होण्यासाठी रवाना झाले. डंपर चालकाला काशी मिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.