Breaking News

महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांचे निधन

Advertisements

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आनंद वसंतराव कुमरे यांचे आज, सोमवारी निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. गेल्या पाच वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Advertisements

महावितरणचे जनसंपर्क अधिकारी म्हणून 2008 पासून आनंद कुमरे यांनी भांडूप, कल्याण, अकोला, नागपूर व चंद्रपूर येथे काम केले आहे.

Advertisements

दरम्यान,पत्रकारिताही केली. चंद्रपूर येथे लोकमत टाईम्सचे प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत होते. महावितरणचे अतिशय प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी असलेले आनंद कुमरे हे चित्रकार, काष्ठ शिल्पकार व मूर्तीकारही होते. चंद्रपूर येथे आनंद कुमरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शेतरस्ता अडविल्यास गुन्हा : आधार कार्ड होणार ‘ब्लॉक’

राज्यातील ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक …

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *