राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी भंडारा जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सोमवार सकाळी 9 वाजता राजभवन नागपूर येथून रामगिरी हेलिपॅड येथे आगमन होईल. त्यानंतर राखीव वेळ. त्यानंतर 9.10 वाजता रामगिरी हेलिपॅडवरून शासकीय हेलिकॉप्टरने भंडारा कडे प्रयाण करतील. सकाळी 9.45 वाजता शहापूर हेलिपॅड येथे आगमन होईल. त्यानंतर 9.50 वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन होईल. सकाळी 10 ते 12:30 दरम्यान राखीव वेळेत शासकीय विश्रामगृह येथे नियोजित कार्यक्रमानुसार अभ्यागतांशी संवाद साधतील .दुपारी 12:30 ते 1.15 दरम्यान राखीव वेळ. त्यानंतर शासकीय विश्रामगृह भंडारा येथून शहापूर हेलिपॅड कडे प्रयाण करतील. दुपारी 1.30 वाजता शहापूर हेलिपॅड येथून गोंदिया जिल्ह्याकडे प्रयाण करतील.
राज्यपाल उद्या भंडारा, गोंदियाच्या दौऱ्यावर
Advertisements
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website