Breaking News

मध्य नागपुरातून BJP आमदार विकास कुंभारे यांचा पत्ता कट? भाजपमधून ‘या’ नावांची जोरदार चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सर्वच मतदारसंघात इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यावेळी अनेक नवीन उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अशातच मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाची देखील सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण या मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत आहे. गेल्या तीन टर्मपासून आमदार असलेले विकास कुंभारे यांच्या ॲंटीइन्कबंन्सीमुळं भाजप पर्यायांच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे.

 

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून ‘या’ नावांची चर्चा

 

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने हलबा नेते दिपराज पार्डीकर आणि माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नावाची चाचपणी केली आहे. मध्य नागपूर मतदारसंघात 90 हजारापेक्षा जास्त हलबा समाजाचे मतदार आहेत. त्यामुळं भाजप हलबा उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जातेय. विजयाच्या निकषावर भाजप उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

लोकसभेनंतर विधानसभेला विदर्भात भाजप घेणार विशेष काळजी

 

लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि विशेषत: विदर्भात जबर दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानमंत्रानंतर उपराजधानी नागपुरात भाजप चांगलीच तयारीला लागली आहे. भारतीय जनता पक्षाने राज्यतील 160 विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांची नावे मागवून घेतली आहे. त्यानुसार विधासभा निहाय पदाधिकार्‍याला आपल्या विधानसभा क्षेत्रासाठी तीन उमेदवारांच्या नावाचे पॅनल सीलबंद लिफाप्यात पक्षाकडे द्यायचे आहे. तर उमेदवार निवडतांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मताला प्राधान्य देण्यासाठी ही नावे मागवून घेतल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण मध्ये पाच विधानसभा क्षेत्रासाठी, तर नागपूर शहारात सहा विधासभा क्षेत्रासाठी पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या पसंतीच्या पॅनेलची नावे मागून घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती नागपूरचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीत आपले प्रमुख उद्दिष्ट सांगत भाजपच्या (BJP) सर्व स्थरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील अनेक जांगावर विजयाची खात्री असणारे उमेदवारच उभे करण्याची शक्यता आहे.

About विश्व भारत

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे कामठी-मौदातून लढणार : ‘विश्व भारत’ची बातमी ठरली खरी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच कोण कोठून लढणार याचे आराखडे बांधणे सुरू केले आहेत. अशातच …

माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डीची भाजपमधून का झाली हकालपट्टी?आशिष जैस्वालला विरोध

जाहीरपणे कोणी महायुतीच्या विरोधात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून वक्तव्य किंवा बंड पुकारले जात असेल अशा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *