Breaking News

मुख्यमंत्री फडणवीस जरा इकडं लक्ष द्या! शेकडो बेरोजगारांची फसवणूक!

सहा महिन्यापूर्वी मोठा गाजावाजा करीत महाराष्ट्र सरकारने बेरोजगारांना महिना दहा हजार रुपयांनी मानधन देण्याची मुख्यमंत्री युवा कार्य कौशल विकास प्रशिक्षण योजना लागू केली. भंडारा जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार आपले नाव नोंदवीत ह्या योजनेत सामील झाले. परंतु भंडाऱ्याच्या शासकीय विभागामध्ये नियुक्त झालेल्या ह्या बेरोजगारांना मागील सहा महिन्यापासून महिन्याचे दहा हजार रुपयांचे मानधन दिलेले नाही. शासनाने बेरोजगारांची थट्टा व फसवणूक केल्याचा आरोप करीत सुमारे ४०० बेरोजगार तरुण तरुणींनी तब्बल ४ तास प्रशासनाला वेठीस धरले.

 

शासनाकडून झालेल्या फसवणुकीच्या विरोधात कौशल्य विकास अधिकारी कार्यालय, शिवाजी स्टेडियम भंडारा येथे जिल्ह्यातील शेकडो बेरोजगारांनी दहा हजार रुपये महिना याप्रमाणे सहा महिन्याचे साठ हजार रुपये आम्हाला शासनाने ताबडतोब द्यावेत. याकरिता युवा व कौशल्य विकास अधिकारी बोंद्रे यांचा घेराव केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजय मेश्राम, बालू ठवकर, माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे, प्रवीण उदापुरे, मनोज लुटे यांसह शेकडो बेरोजगार तरुण यावेळी कौशल्य विकास अधिकारी कार्यालयाचे आवारात ठाण मांडून बसले होते.आता खूप झाले राजकारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी युवक करीत आहेत.

 

जोपर्यंत आमचे हक्काचे मानधन सहा महिन्याचे एकूण ६० हजार रुपये आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही. असा पवित्रा बेरोजगार युवकांना घेतला. युवा कौशल कार्यालय येथेच मुक्काम करण्याचा घाट बांधला. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भंडारा जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व विभिन्न सामाजिक व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा ह्या ठिकाणी जमले होते. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस दलाला सुद्धा पाचारण करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस दडपशाहीचा वापर करत आहेत असा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला.

 

यावेळी पोलिसांनी बेरोजगारांच्या विरोधात दडपशाचे धोरण अवलंबिले. शेवटी कौशल्य विकास अधिकारी बोंद्रे यांनी बेरोजगार युवकांना आठ दिवसात त्यांचे साठ हजार रुपये आम्ही मिळवून देऊ असे आश्वासन दिले. त्यामुळे आता आठ दिवसाची वाट पाहत आंदोलन कार्यांनी नमती भूमिका घेतली. महाराष्ट्र सरकार हे बेरोजगारांसाठी योजना तर काढते परंतु पैसे मात्र देत नाही. बेरोजगारांची फसवणूक करते. असा आरोप बेरोजगार तरुणांनी केला. या वेळी दुर्गा आकरे, प्रिती शेंडे, निलम मेश्राम, सोनाली कुकडकर, धम्मदीप मेश्राम, अक्षय गायधने, सौरभ ठवकर, हर्षल निर्वाण, विवेक लोखंडे, राधे भोंगाडे यांसह शेकडो युवा कार्य प्रशिक्षण बेरोजगार युवक आंदोलनाचे वेळी उपस्थित होते.

About विश्व भारत

Check Also

विधानसभा निवडणुकीत कसा झाला घोळ?’कंट्रोल युनिट’वर संशय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेतला जात आहे. कंट्रोल युनिट वरील बारकोड बदलविल्याचा संशय विरोधी …

असम सरकार ने गौमांस पर लगाया प्रतिबंध : कांग्रेस का कडा विरोध

असम सरकार ने गौमांस पर लगाया प्रतिबंध : कांग्रेस का विरोध टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *