Breaking News

पुलाचे बांधकाम पुरहानी दुरुस्ती कार्यक्रमातुन करण्याच्या अधिका-यांना खासदार रामदास तडस यांच्या सुचना

Advertisements

देवळी ते दिघी बोपापूर जाणा-या रस्तावरील यशोदा नदीवरील पुलाची खासदार रामदास तडस यांनी केली पाहणी.

Advertisements

देवळी- देवळी ते दिघी बोपापूर जाणा-या यशोदा नदीवरील पुलावर मोठया प्रमाणात भेगा पडल्याने दिघी बोपापूर जाणा-या वाहतुकीची मोठया प्रमाणात खोळबंलेली होती. शेतीचे दिवस असल्याने शेतकरी वर्गाला शेतीसाहितय, आकस्मीत रुग्णांना उपचार करण्यासाठी, तसेच कामानिमीत्य इतर ठिकाणी जाण्यायेण्याचा पुलामुळे वाहतुक खोळबंल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक वर्षापासून असलेल्या प्रलंबीत पुलामुळे दरवषी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तातडीने नविन पुल बांधण्याची मागाणी सर्व स्तरावरुन होत आहे.

Advertisements

       याची दखल घेऊन दिनांक 30 ला. खासदार रामदास तडस यांनी प्रत्यक्ष देवळी ते दिघी बोपापूर जाणा-या यशोदा नदीवरील पुलावर जावून पाहणी केली, देवळी-दिघी (बोपापूर) रस्तावरील पुल फारच क्षतीग्रस्त झाल्यामुळे या पुलाची पुर्नबांधणी आवश्यक आहे, तसेच पुल क्षतिग्रस्त असल्यामुळे जाण्यायेण्याचा रस्ता बंद झालेला असल्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण झालेली आहे, या पुलावर भेगा पडल्यामुळे पुल नदीच्या आलल्या पाण्याच्या प्रवाहामुळे पुल वाहून जाण्याची भिती असल्यामुळे तात्काळ दुरुस्ती करणे व नविन पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम हे पुरहानी दुरुस्ती कार्यक्रमातुन करण्याच्या सुचना खासदार रामदास तडस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिल्या.

       यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पैठणकर व राणे, उपाध्यक्ष डाॅ. नरेन्द्र मदनकर, भाजपा तालुका अध्यक्ष दशरथ भुजाडे, भाजपा शहर अध्यक्ष रवी कारोटकर, आशिष दिघीकर, सुनिल तालन, सुनिल काळे, बाबाराव मसराम, नितीन दरने, सुनिल पचारे उपस्थित होते.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष चर्चा

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष …

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते हैं उपराज्यपाल

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *